Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसने उपस्थित केलाय ‘तो’ गंभीर मुद्दा; करोना लसबाबत पहा काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

सध्या मुंबई आणि पुण्यातील अनेक करोना लस केंद्रात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद आहे. त्याचवेळी आजपासून 18 ते 45 या वयोगटातील लसीकरणाची नोंदणी सुरू होत आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्य सरकारलाच पुढील किमान 25 दिवस थेट लस देता येणार नसल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. तोच मुद्दा पकडून महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, पुण्यातील सीरम संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले की 20 मे पर्यंत लस पुरविता येणार नाही कारण सर्व साठा मोदी सरकारने बुक केलेला आहे. यामुळे १ मेपासून होणारा 18–44 या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाचा कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोरोना आल्यानंतर इतक्या महिन्यांनंतर आपण लसींच्या अभावावर चर्चा करणे हे संपूर्णपणे चुकीचे आहे. मोदीजी,तुमची रणनीती कोठे आहे? मोदीजींना एवढ्या मोठ्या लसीकरणासाठी पुरवठा कसा होणार याची कोणतीही माहिती नाही. मोदीजींनी 2 कंपन्यांकडून पुरवठा मर्यादित केला व म्हटले की राज्य सरकारने 18-44 गटातील लसीकरणासाठी या कंपन्यांकडून खरेदी करावी.

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “सीरम @OfficeofUT जी यांना सांगितले की 20 मे पर्यंत लस पुरविता येणार नाही कारण सर्व साठा मोदी सरकारने बुक केलेला आहे. यामुळे १ मेपासून होणारा 18–44 या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाचा कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोरोना आल्यानंतर इतक्या महिन्यांनंतर आपण लसींच्या” / Twitter

Advertisement

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या ढिसाळ नियोजनालाही लक्ष्य केले आहे. सावंत यांनी म्हटलेय की, केंद्र सरकार केवळ 45 वर्षांपेक्षा जास्त वयाची काळजी घेईल. बाकीची जबाबदारी राज्यावर ढकलली. मोदीजी, संपूर्ण देशात लसीकरण पूर्ण होण्याचे लक्ष्य जनतेला सांगा. तारीख सांगू शकता? देशाला अशा भयंकर संकटात अत्यंत बेफिकीर नेतृत्व मिळाले व देशाची जगात नाचक्की होत आहे हे देशाचे दुर्दैव आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply