Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने जिंकली भारतीयांची मने; ऑक्सिजनसाठी ३७ लाखांची मदत

मुंबई :
आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील अनेक शहरांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे सुमारे ३७ लाखांची मदत जाहीर केली आहे. गरजूंना मदत करण्यासाठी त्यांनी पीएम केअर फंडला ५० हजार डॉलर्स देण्याचे ठरविले आहे.

Advertisement

त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करुन लिहिले की, ‘भारत हा असा देश आहे जिथे मला कित्येक वर्षांमध्ये खूप सहकार्य मिळाले आहे आणि इथले लोक खूप प्रेमळ आहेत. मला माहित आहे की कोरोना विषाणूमुळे देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता यासह अनेक समस्या आल्या आहेत. त्यामुळे खेळाडू या नात्याने मी पीएम केअर फंडात सहाय्य स्वरूपात ५० हजार अमेरिकन डॉलर्स देऊ इच्छितो.

Advertisement

कमिन्सने पुढे असेही लिहिले आहे की, मी माझ्या सहकारी खेळाडूंनाही मदतीसाठी पुढे यावे अशी विनंती करतो. कदाचित मला उशीर झाला असेल परंतु याद्वारे आम्ही लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करू. ‘ शेवटी त्याने लिहिले की जरी माझी मदत मोठी नसली तरी ते एखाद्याचे आयुष्य बदलू शकते.

Advertisement

कोरोनामुळे भारतातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे बऱ्याच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल २०२१ मधून माघार घेतली आहे. अँर्ड्यू टाय, ॲडम जंपा आणि केन रिचर्डसन यांचा यात समावेश आहेत. झम्पा आणि रिचर्डसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतात. तथापि, हे दोन खेळाडू स्पर्धेतून माघार घेत असूनही, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिश्चन आणि डॅनियल सॅम्स यांच्या रूपात आणखी तीन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आरसीबी संघात राहतील. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यासारख्या मोठ्या खेळाडूंसह सध्या १४ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आयपीएल खेळत आहेत.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply