Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : ‘या’ गोलंदाजाने केला दावा; म्हणून अनेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आयपीएल सोडू शकतात

मुंबई :
ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज अँर्ड्यू टायने आयपीएल २०२१ सोडल्यामुळे भारतात कोरोना प्रकरणं वाढल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यास बंदीची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्याने असा दावा केला आहे की, ऑस्ट्रेलियाचे बरेच क्रिकेटर्स हा निर्णय घेऊ शकतात. टाय म्हणाला की, त्याने हा निर्णय भारतवरून त्याच्या पर्थ या गावी जाणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जात असल्यामुळे घेतला आहे. टायने अद्याप रॉयल्ससाठी एकही सामना खेळलेला नाही आणि त्याला १ कोटी या बेस प्राईसमध्ये विकत घेण्यात आले होते.

Advertisement

सोमवारी टायने दोहा येथून ‘सेन रेडिओ’ला सांगितले, याची बरीच कारणे आहेत, पण मुख्य कारण म्हणजे पर्थमध्ये भारतातून परत जाणाऱ्या लोकांना हॉटेल्समध्ये अलग ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. तो म्हणाले की, बबलमध्ये राहिल्यामुळे थकवा जाणवत आहे. मला वाटले की, मला देशात प्रवेश मिळणार नाही, त्यापूर्वीच मी निघून जावे. बबलमध्ये बराच वेळ घालवणे खूप कंटाळवाणे आहे. ऑगस्टपासून, मी केवळ ११ दिवस बबलच्या बाहेर आहे आणि आता मला घरी जायचे आहे.

Advertisement

ब्रिटन, न्यूझीलंडसह अनेक देशांनी भारताच्या प्रवासावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियानेही उड्डाणांमध्ये ३० टक्क्यांनी कपात केली असून पुढील काळात प्रवेशबंदी होण्याची शक्यता आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज तीन लाख प्रकरणे समोर येत आहेत. ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्ससुद्धा आयपीएलमध्ये खेळत आहेत. टाय म्हणाला की, बरेच खेळाडू परतीचा विचार करीत आहेत.

Advertisement

टाय म्हणाला की, आयपीएल आणि बीसीसीआयने आम्हाला सुरक्षित ठेवले आहे, परंतु लोक कोरोनाशी झुंज देत आहेत आणि आम्ही क्रिकेट खेळत आहोत, हे खूप वाईट असल्याचे तो म्हणाला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ते आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि समालोचकांशी संपर्क साधत आहेत आणि परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply