Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून आर. अश्विनने घेतली आयपीएलमधून माघार; ‘हे’ आहे कारण

मुंबई :
रविचंद्रन अश्विनने कोरोना संसर्ग वाढीमुळे ही स्पर्धा मध्यभागी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूचा हा ऑफस्पिनर दिल्ली कॅपिटल संघात होता. आपल्या या निर्णयाबद्दल माहिती देताना तो म्हणाला की, आपल्या कुटुंबासमवेत त्याला वेळ घालवायचा असल्याने त्याने हा निर्णय घेतला. अश्विनने हा निर्णय सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर ट्विट करुन जाहीर केला. दिल्ली कॅपिटल फ्रँचायझीनेही अश्विनच्या निर्णयाचा पूर्ण आदर केला आहे.

Advertisement

अश्विनचे कुटुंब आणि त्याचे निकटवर्तीय या प्राणघातक कोरोना विषाणूंविरूद्ध लढत आहेत, म्हणून अशा कठीण परिस्थितीत रवीला त्याच्या जवळच्यांसोबत राहायचे आहे. जर सर्व काही ठीक राहिले तर तो परत येईल. अन्यथा पुढच्या वेळी चाहते त्याला दिल्लीच्या जर्सीमध्ये पाहू शकतील. अश्विन सध्या त्याच्या मूळ गावी चेन्नईमध्ये आहे, जेथे त्याचा संघ दिल्ली कॅपिटल आयपीएलमध्ये खेळत आहे. अश्विनने या मोसमात आतापर्यंत दिल्लीसाठी सर्व ५ सामने खेळले आहेत. चार विजय आणि एका पराभवाने, त्याचा संघ चेन्नई सुपरकिंग्जनंतर पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement

दरम्यान, चालू हंगामात आयपीएलला अलविदा म्हणणारा ३४ वर्षीय अश्विन हा एकमेव खेळाडू नाही, वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच खेळाडूंनी स्पर्धा सोडली आहे. राजस्थान रॉयल्सचा फलंदाज लियाम लिव्हग्स्िंटन गेल्या आठवड्यात बायो-बबल थकव्यामुळे या स्पर्धेतून माघारी परतला. राजस्थानचा अष्टपैलू अँर्ड्यू टायनेही वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मागील हंगामात देशातील कोरोना साथीमुळे युएईमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. तेव्हा चेन्नई सुपरकिंग्जचे सुरेश रैना, हरभजन सिंग यांनीही स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply