Take a fresh look at your lifestyle.

डॉक्टर, नर्सेसना फुकट हवाई सफर; पहा कोणत्या विमान कंपनीने ऑफर दिलीय..!

मुंबई :
कोरोना महामारी आल्यापासून आपला जीव धोक्यात घालून अनेक डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ रुग्णसेवेत गुंतला आहे. अनेकांना त्यांनी या महामारीतून सुखरूप बाहेर काढण्याचं काम केलं आहे. माञ, रुग्णावरील उपचाराच्या निमित्ताने अनेकदा डाॅक्टर, नर्सेस यांना प्रवास करण्याची वेळ येते. या पार्श्वभूमीवर ‘विस्तारा’ या विमान कंपनीने डॉक्टर आणि नर्ससाठी एक अनोखी ऑफर दिलीय. कंपनी देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांना मोफत विमान प्रवास देणार आहे. तशी सुविधा देण्याची घोषणा या विमान कंपनीने केलीय.

Advertisement

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी यांना पाठवलेल्या पत्रात ‘विस्तारा’ कंपनीने या ऑफरबद्दल माहिती दिलीय. पत्रात कंपनीने म्हटले आहे, की संकटाच्या वेळी आम्ही या योद्धांच्या सर्व सुविधांची काळजी घेण्यास तयार आहोत.
उषा पाधी यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘विस्तारा’च्या पत्राबद्दल माहिती दिलीय. सरकारी संस्था आणि रुग्णालयांच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी ‘विस्तारा’ हवाई वाहतुकीची सुविधा देण्यास तयार आहे. या व्यतिरिक्त कोरोनाशी सामना करण्यासाठी कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या विनामूल्य हवाई प्रवासाचा प्रस्ताव दिलाय. आपण एकत्र येऊन या संकटाशी लढू या, असंही ‘विस्तारा’नं सांगितलंय.

Advertisement

कंपनीने म्हटले आहे, की ते फ्रंटलाईन कामगारांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी विनामूल्य घेऊन जाण्यास तयार आहेत. डॉक्टर आणि परिचारिकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी ये-जा करण्याची सुविधा देऊ शकल्यास आम्हाला खूप आनंद होईल, असेही पत्रात म्हटलेय. काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या जागी परत पाठवण्याची जबाबदारीदेखील घेण्यास तयार आहोत.

Advertisement

अशी आहे अनोखी ऑफर
‘विस्तारा’ कंपनीने निवेदनात म्हटले आहे, की आम्ही वैद्यकीय डॉक्टर्स आणि नर्सेसना मोफत ही सुविधा देण्यास तयार आहोत. मात्र, जागांची मर्यादीत उपलब्धता लक्षात घेता, जो पहिल्यांदा येईल, त्याला पहिल्या जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहोत.

Advertisement

या कंपन्याही सरसावल्या!
‘स्पाईसजेट’ आणि ‘इंडिगो’ या विमान कंपन्यांनी देश किंवा विमान उड्डाण तिकिटांसाठी वेळ किंवा तारीख बदलण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. इंडिगो कंपनीने 30 एप्रिलपर्यंत, तर ‘स्पाईसजेट’ कंपनी नव्या बुकिंगसाठी 15 मेपर्यंत चेंज शुल्क घेणार नाही.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply