Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : सुरेश रैनाने षटकार मारत नोंदवला ‘हा’ भन्नाट विक्रम

मुंबई :
आयपीएल २०२१ च्या १९ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चेन्नई सुपर किंग्जने पराभूत केले असून नाणेफेक जिंकल्यानंतर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी संघाला जोरदार सुरुवात करुन दिली आणि पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. गायकवाड ३३ धावांवर बाद झाला. कर्णधार धोनीने आज सुरेश रैनाला आपल्या पसंतीच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. डावखुरा रैनाही खूप चांगल्या लयीत दिसला. युझवेंद्र चहलच्या चेंडूवर षटकार मारत रैनाने आयपीएलमध्ये आपले २०० सिक्सही पूर्ण केले आहेत.

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगमध्ये २०० षटकार ठोकणारा सुरेश रैना हा ७ वा फलंदाज आहे. भारताकडून रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांचे या यादीमध्ये नावे आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, त्याने आतापर्यंत या टी २० लीगमध्ये ३५४ षटकार ठोकले आहेत. गेलच्या पाठोपाठ एबी डिव्हिलियर्स आहे. त्याने आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात २४० षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माने २२२ तर विराट कोहलीने २०४ षटकार लगावले आहेत. आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत विराट कोहली अव्वल आहे आणि या लीगमध्ये ६ हजार धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

Advertisement

या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाने उत्कृष्ट कामगिरी केली असून संघाने पहिला सामना गमावल्यानंतर सलग चार सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आतापर्यंत आयपीएल २०२१ मध्ये एकही सामना गमावला नव्हता, मात्र त्यांना चेन्नईिवरुध्द आजच्या सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. आरसीबीचा हा हंगामातील पहिला पराभव आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply