Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : शुभमन गिलबाबत केकेआरच्या प्रशिक्षकाने केली ‘ही’ भविष्यवाणी

मुंबई :
कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचे प्रशिक्षक डेव्हिड हसी यांनी खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या शुभमन गिलचे समर्थन केले असून हा सलामीवीर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अखेरीस सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल अशी भविष्यवाणी केली आहे. २१ वर्षीय शुभमनने या हंगामात अपेक्षेप्रमाणे फलंदाजी केलेली नाही आणि पाच सामन्यांत त्याने केवळ ८० धावा केल्या आहेत.

Advertisement

राजस्थान रॉयल्सविरुध्दचा सामना केकेआरने सहा विकेट्ने गमावल्यानंतर हसी म्हणाला, तो एक स्टार खेळाडू आहे, त्याने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यांत शानदार कामगिरी केली आहे. तो आपल्या कामाबद्दल अगदी प्रामाणिक आहे. तो पुढे म्हणाला, मी एवढेच सांगू शकतो की फॉर्म येतो आणि जातो परंतु आपली पातळी कायम आहे. हसी म्हणाला, मैदानात आणि बाहेर दोन्ही बाजूंनी तो एक चांगला स्तराचा खेळाडू आहे. लक्षात ठेवा, स्पर्धेच्या शेवटी तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये असेल, असे हसी म्हणाला.

Advertisement

विजयासह स्पर्धेला सुरुवात करणा केकेआरला शनिवारी हंगामातील सलग चौथा पराभव पत्करावा लागला आणि संघ गुणतालिकेत तळाशी आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याला आतापर्यंत संधी का मिळाली नाही असे विचारले असता हसी म्हणाला की, टीम मॅनेजमेंट बसून याबाबत रणनीती आखेल. तो म्हणाला, लॉकी फर्ग्युसन गोलंदाजीत पहिल्या स्थानावर आहे, तो जागतिक स्तराचा गोलंदाज आहे आणि त्याने न्यूझीलंडसाठी शानदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी युएईमध्येही संघासाठी त्याने चांगली कामगिरी केली होती. पुढच्या सामन्यात तो निवडीसाठी दावा करेल. सामन्यापूर्वी आम्ही सर्व डावपेच आखणार असल्याचे तो म्हणाला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply