Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : वयाच्या ४२ व्या वर्षी चेन्नईच्या ‘या’ खेळाडूने दाखवली इतकी चपळता

मुंबई :
आयपीएल २०२१ च्या महत्त्वपूर्ण सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६९ धावांनी पराभव केला. या सामन्यात रविंद्र जडेजाने आपले वर्चस्व सिध्द केले. त्याने फलंदाजी करताना २८ चेंडूत नाबाद ६७ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना तीन विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानेही क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी केली. पण या सामन्यात सीएसकेच्या इम्रान ताहिरने उत्तम कामगिरी बजावली. हा खेळाडू आयपीएल २०२१ मध्ये प्रथमच मैदानात उतरला. त्याने चार षटकांत केवळ १६ धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले. त्याने एका खेळाडूला धावबाद देखील केले. वयाच्या ४२ व्या वर्षीही इम्रान ताहिरने आपल्या तंदुरुस्तीची आणि फिरकीची जादू कायम असल्याचे दाखवून दिले.

Advertisement

ताहिरने आरसीबीचे दोन लोअर ऑर्डर फलंदाज बाद केले. त्याने हर्षल पटेल (०) आणि नवदीप सैनी (२) यांना बाद केले. पटेलला बोल्ड आऊट तर सैनीला स्लिपमध्ये सुरेश रैनाकडे झेल देण्यास त्याला भाग पाडले. यानंतर, ताहिरने थेट स्क्वे अर लेगवरुन चेंडू फेकला आणि कायल जेम्ससनला धावबाद केले. त्याने ज्या वेगात आणि अचूकतेने चेंडू फेकला त्यावरून ताहिरने सर्वांना आश्चर्यचकित केले.

Advertisement

दरम्यान, आयपीएल २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना इम्रान ताहिरने ऑरेंज कॅप जिंकली होती. पण आयपीएल २०२० मध्ये त्याला फक्त तीन सामने खेळता आले. त्या हंगामात त्याला एकच विकेट मिळाली. या हंगामातही एमएस धोनीने पहिल्या चार सामन्यात त्याला संधी दिली नाही. पण आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मोईन अलीला दुखापत झाल्यानंतर इम्रान ताहिरने प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश मिळवला. धावबाद केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना तो म्हणाला की, हे खूप चांगले असून आशा आहे की प्रत्येकानेे ते पाहिले असेल.
 संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply