Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून पराभवानंतरही आरसीबीचा कर्णधार कोहली आहे आनंदी..!

मुंबई :
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएल २०२१ च्या सामन्यात ६९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला असला तरी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहली आनंदी आहे. याचे कारण रवींद्र जडेजाची कामगिरी आहे. कारण टी २० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे, अशा परिस्थितीत या अष्टपैलू खेळाडूच्या कामगिरीतील सुधारणा ही टीम इंडियासाठी खूप चांगली बातमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो जखमी झाला होता. यानंतर तो आयपीएलमध्ये दाखल झाला. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जडेजाने क्रिकेटच्या तीनही विभागात शानदार कामगिरी केली.

Advertisement

प्रथम फलंदाजी करताना त्याने २८ चेंडूत चार चौकार व पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा फटकावल्या. त्याने चार षटके गोलंदाजी करत १३ धावा देऊन तीन बळी घेतले. तो येथेच थांबला नाही, तर त्याने शानदार फिल्डिंग करुन दाखवत एकास धावबाद केले. जडेजाने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे आनंदित झालेला कोहली म्हणाला की, दोन महिन्यांनंतर तो भारताकडून खेळेल आणि मुख्य अष्टपैलू खेळाडू अशी दमदार कामगिरी करतोय, हे पाहून आम्ही सगळेच आनंदी आहोत.

Advertisement

दरम्यान, जडेजाने चेन्नईच्या डावाच्या शेवटच्या षटकात हर्षल पटेलची चांगलीच धुलाई करत विक्रम केला. त्याने एका षटकात ५ षटकार आणि १ चौकार ठोकला. या षटकात त्याने तब्बल ३७ धावा कुटल्या. हर्षल पटेलचा बचाव करताना कोहली म्हणाला की, हर्षलने चांगली गोलंदाजी केली आणि आम्ही अजून त्याचे समर्थन करत राहू. त्याला जबाबदारी देत राहू. त्याने दोन्ही सेट फलंदाजांना बाद केले आणि सामन्यावर आम्हाला पकड मिळवून दिली होती, असे तो म्हणाला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply