Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून कृणाल पांड्याचे चाहते म्हणतात, ‘हे वागणं बरं नव्हं.!’

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा सर्वात यशस्वी फ्रँचाइजी संघ मुंबई इंडियन्सचा सध्याचा हंगाम अजून काही खास प्रभावी ठरताना दिसत नाहीये. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. २३ एप्रिलला चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्ज विरुद्ध ९ विकेटने पराभव पत्करावा लागला. कृणाल पांड्याने तीन षटकांत ३१ धावा केल्या आणि एकही विकेट घेतली नाही. या दरम्यान, कृणालनेही तीन वाइड बॉल टाकले, त्यातील दोन बॉल तर सलग वाइड होते.

Advertisement

saif shaikh on Twitter: “Krunal Pandya to bowling coach after he gets hits for a boundary #PBKSvMI https://t.co/1l4qZQOvsl” / Twitter

Advertisement

कृणाल पंड्याची गोलंदाजी या सामन्यात प्रभावी ठरली नाही आणि तो क्षेत्ररक्षकांवर रोष काढताना दिसला. कृणाल पंड्याच्या चाहत्यांना त्याचे हे वागणे विशेष काही आवडले नाही. कृणाल पंड्याच्या फिल्डवरील या वागणुकीबद्दल त्याच्या चाहत्यांनी अनेक मेम्स शेअर केल्या आहेत.

Advertisement

Prathmesh Patil🇮🇳 on Twitter: “Expressions of krunal pandya after every ball are like, he’s bowling ‘The Ball of the century’ but every time it’s fault of fielders 😂 #MI #IPL2021 https://t.co/hSpuzrsnYc” / Twitter

Advertisement

या हंगामात कृणाल पांड्याने आतापर्यंत पाच सामने खेळले असून या कालावधीत एकूण १६ षटके गोलंदाजी केली आहेत. कृणालने ७.२५ च्या इकॉनॉमी रेटने ११६ धावा दिल्या आहेत आणि त्याने फक्त तीन विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय या हंगामात आतापर्यंत कृणाल फलंदाजीमध्येही काही खास कामगिरी करू शकलेला नाही. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement

Deepak on Twitter: “Krunal Pandya to fielders- Abey tere gravitational force ke karan ball leg side me drift kar gayi mene to seedhi fenki thi 😅 #Cricket https://t.co/1vhUrsVIZT” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply