Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या ‘त्या’ गोष्टीमुळे गेलेत भारतीयांचे हकनाक बळी; आंबेडकरांनी केली टीका

पुणे :

Advertisement

जगभरात सध्या करोना विषाणूची दुसरी लाट आलेली आहे. या संकटामुळे केंद्र आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा स्पष्ट झाल्याची टीका सोशल मीडियामध्ये केली जात आहे. त्याचवेळी आता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या गंभीर मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान निधीतील पैसा वापरण्यात मोदींचं कौतुक करण्यासारखं काहीही नाही. तसेच लस नी औषधे जगभरात देऊन नरेंद्र मोदींनी जागतिक प्रसिद्धीपायी आपल्या देशातील नागरिकांचे हकनाक बळी घेतलेत. आरोग्य विभागाच्या एक्स्पर्ट टीमने कोरोनाची दुसरी भयंकर लाट येऊ शकते ! हे सांगून पण महाराष्ट्र सरकारने मागच्या वेळी उभारलेले मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर कमी केले हे दुर्दैवी आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, देशभरात करोना बाधित रुग्णसंख्या वाढत असताना मोदी यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवण्याच्या मुद्याला प्राधान्य दिले. निवडणुकीत मोदी आणि शाह या दोघांनी मिळून देशभरात तब्बल २९४ सभा घेतल्या आहेत. रुग्णसंख्या वाढताना मोदी नीरोसारखेच वागत होते. रोम जळताना नीरो व्हॉयलीन वाजवत होता. तर, मोदी यांचे लक्ष फ़क़्त बंगालवर होते. पंतप्रधान निधीमध्ये किती निधी आला याची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. पण यात हजार कोटींपेक्षा अधिक पैसे आले असून तोच खर्च करताना भाजप नेते आणि कार्यकर्ते मोदींचे कौतुक करीत आहेत. भाजपवाले त्यांची पाठ थोपटत आहे. यातून काय हे काय साध्य करीत आहेत?

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply