Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची बातमी : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने घरात असतानाही ‘हे’ करण्याचा दिलाय सल्ला..!

दिल्ली :

Advertisement

देशाला सध्या कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागत आहे. दररोज विक्रमी नवे रुग्ण सापडत असल्याने सरकारसह सामान्य माणसांनाही काळजी वाटत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला अनेकांनी थेट त्सुनामी देखील म्हटले आहे. दरम्यान, लसीकरण आणि संरक्षणासाठी योग्य पध्दतींचा अवलंब करण्यावर जोर देतानाच केंद्र सरकारने आता लोकांनी घरामध्येही मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisement

सरकारने लसीकरण मोहिमेस वेग देतानाच आवाहन केले आहे की, मासिक पाळीच्या वेळीही महिला लस घेऊ शकतात. पत्रकार परिषदेत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, बरेच लोक सध्या भीतीपोटी रुग्णालयात दाखल होत आहेत. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एखाद्याला रुग्णालयात दाखल करावे, यावर भर दिला जावा. त्यामुळे रुग्णालयाचे बेड गरज नसताना अडवले जाणार नाहीत, यासाठी त्यांनी असे म्हंटले आहे.

Advertisement

वैद्यकीय ऑक्सिजनच्या अभावावर सरकारने असे म्हटले आहे की, भारतात पुरेसे वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध आहे. पण त्याला रुग्णालयात नेण्याचे म्हणजे वाहतुकीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच सरकारने रुग्णालयांना तर्कसंगतपणे ऑक्सिजनचा वापर करण्यास सांगितले आहे. त्वरित रीमाडेसिव्हिर आणि टोसिलिजुमाब यासारखी औषधे लिहून देण्याचा आग्रहही रूग्णांनी केला असल्याने याच तुटवडा भासत आहे.

Advertisement

सरकारने असे म्हटले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने पर्सनल डिस्टंस नियमाचे पालन केले नाही तर तो 30 दिवसांत 406 लोकांना संक्रमित करू शकतो. जर संक्रमित व्यक्तीची क्रियाशीलता 50 टक्क्यांनी थांबली तर या काळात असा रुग्ण फ़क़्त 15 लोकांना संसर्ग होईल. त्याच वेळी योग्य काळजी घेतली तर याची शक्यता थेट 75 टक्क्यांनी कमी होऊन एखादी बाधित व्यक्ती 30 दिवसांत 2.5 लोकांना संक्रमित करू शकते. त्यामुळेच करोना साथ आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी घरातही मास्क वापरावेत.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

Advertisement

Leave a Reply