Take a fresh look at your lifestyle.

‘महाविकास’वाले भ्रमित करीत आहेत; कोविड लसप्रकरणी फडणविसांनी केली टीका

मुंबई :

Advertisement

आज राज्याला सर्वाधिक 4.35 लाख रेमडेसिवीर मिळाल्या. 1750 मेट्रीक टन इतका सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला. या संकटात अशी तुलना करणे योग्य नाही. पण, ज्यांना तीच भाषा समजते, त्यांना सांगायचे तर इतर राज्यांपेक्षा हा दुप्पट कोटा आहे. 1100 हून अधिक व्हेंटिलेटर्स सुद्धा नव्याने महाराष्ट्राला मिळत आहेत. अशा संकटात कांगावेखोरांनी या संकटसमयी लोकांना रोज सकाळी भ्रमित करू नये, अशी अपेक्षा आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले की, केंद्र सरकारतर्फे प्रत्येक पात्र व्यक्तीचे मोफत लसीकरण होणार आहे, ही बाब कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनातून स्पष्ट केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे. तथापि कोणत्या राज्याला या अभियानाला आणखी गती द्यायची असेल तर राज्यांना लसी विकत घेण्याची स्वायत्तता देण्यात आली आहे. मात्र, लसीकरणाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. त्यामुळेच कुणी कोणत्या घोषणा करतात आणि नंतर ट्विट डिलीट करतात.

Advertisement

अंधेरी पूर्व येथे कोळडोंगरी येथे रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन आणि केशव सृष्टी ट्रस्टच्यावतीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. इस्कॉन आणि इतरही संस्था सुद्धा यात विविध मदत देत सहभागी झाल्या आहेत. आज लोकांना रूग्णालयात दाखल होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असताना याठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठा दिलासा यातून मिळणार आहे. नित्यानंद महापालिका शाळा, अंधेरी पूर्व येथे स्थापन करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये 24 बाय 7 डॉक्टर्स आणि वैद्यकीय चमू आहेत. ऑक्सिजन, रूग्णवाहिका, समुपदेशन आणि इतरही सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष संजय पांडे यांच्यासह इतरही यावेळी उपस्थित होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply