Take a fresh look at your lifestyle.

चीनने दिला पुन्हा एकदा धोका; पहा कशी केलीय भारताची अडवणूक

दिल्ली :

Advertisement

कोरोना संकटामध्ये मदत करणे तर सोडाच, पण ऐनवेळी अडवणूक करून चीनने पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केला आहे. चीनची सरकारी विमानसेवा सिचुआन एअरलाइन्सने 15 दिवसांसाठी भारतातील सर्व मालवाहू उड्डाणे रद्द केली आहेत. ही विमाने भारताला आवश्यक असणारी ऑक्सिजन केंद्रे व इतर वैद्यकीय उपकरणे पुरवित होती. आता चीनमधील खासगी व्यावसायिकांकडील वैद्यकीय उपकरणे भारतात आणण्यास अडचण निर्माण झाली आहे.

Advertisement

चीनी उत्पादकांनी ऑक्सिजन उपकरणांच्या किंमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढविल्याच्याही तक्रारी आहेत. इतकेच नाही तर चीनहून मालाच्या मालवाहतुकीसाठी घेण्यात आलेल्या शुल्कामध्येही 29 टक्के वाढ करण्यात आली आहे. शांघायमधील सिनो ग्लोबल लॉजिस्टिक या मालवाहतूक कंपनीच्या सिद्धार्थ सिन्हा यांनी पीटीआयला सांगितले की, सिचुआन एअरलाइन्सच्या निर्णयामुळे दोन देशातील व्यापारी ऑक्सिजन कंसंट्रेटरची आयात आणि भारतात पोचण्यास अडथळा आलेला आहे.

Advertisement

सिचुआन चुआनहांग लॉजिस्टिक कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मार्केटिंग यांनी पत्रात म्हटले आहे की, विमान कंपनीने शीआन-दिल्लीसह सहा मार्गांवर आपली मालवाहतूक स्थगित केली आहे. व्यापारात अचानक बदल झाल्यामुळे आयात कमी झाली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस उड्डाण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय मार्ग हा नेहमीच सिचुआन एअरलाइन्सचा मुख्य मार्ग आहे. ऑपरेशन्स थांबविण्यामुळे आमच्या कंपनीचे मोठे नुकसान होईल. या परिस्थितीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply