Take a fresh look at your lifestyle.

‘सीरम’च्या भाववाढीविरोधात ‘वंचितां’चा संताप; पहा नेमका काय इशारा दिलाय आंबेडकरांनी

पुणे :

Advertisement

कोव्हिशील्ड लस ज्या देशांनी भारतातून घेतली त्यांना कमी किमतीत आणि आपल्याच देशाला जास्त किमतीत विकण्याचा खेळ सीरम इन्स्टिट्यूट यांनी केला आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. काहींनी यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. तर, आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Advertisement

त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, परदेशात ३ डॉलर ते ५ डॉलरमध्ये पाठवली जाणारी लस भारतीयांना थेट ६०० रुपये किमतीला मिळणार आहे. पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास ८ डॉलर दराने घ्यावी लागणार आहे आणि त्याचे समर्थन केंद्र सरकार करीत आहे. यातून केंद्र सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसून येत आहे. आठवड्याभराची मुदत देत आहोत, ही लस आम्हाला सरकारला मिळणार्‍या १५० रुपयांत न मिळाल्यास प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन केले जाईल.

Advertisement

अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशील्ड लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने या आठवड्याच्या सुरुवातीला लशीची किंमत प्रत्येक मात्रेसाठी ६०० रुपये आणि राज्य सरकारांसाठी, तसेच केंद्र सरकारच्या नव्या करारासाठी ४०० रुपये अशी जाहीर केली आहे. आधीची किंमत ‘अ‍ॅडव्हान्स्ड फंडिंग’वर आधारित होती व आता आपल्याला लशीचे उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची असल्याचे सांगून केंद्र सरकारने सीरमची पाठराखण केली आहे. परदेशाला ज्या किमतीत द्यायला ही लस परवडते, त्याच किमतीला भारतीयांना द्यायला, या संस्थेला कशी परवडत नाही, असे प्रश्न उपस्थित होते आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply