Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री झालेत थेट ‘मिस्टर इंडिया’; आंबेडकरांच्या टीकेवर भाजपची प्रतिक्रिया

मुंबई :

Advertisement

‘करोना कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात’, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. त्यावर मुख्यमंत्री झालेत थेट ‘मिस्टर इंडिया’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुधा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील. अर्थात ही बाब प्रकाश आंबेडकरांच्या फार उशीरा लक्षात आल्याचे दिसते आहे. https://t.co/fZJLlcpaEh https://t.co/AD8KudQmCe” / Twitter

Advertisement

जे काही जाहीर करायचं असतं, ते अजित पवारच जाहीर करतात. अजित पवार मला डीफॅक्ट (बरेच दोष असणारे) मंत्री वाटतात अशी टीका करतानाच आंबेडकरांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री पवार म्हणतात की, रेमडेसिविर राज्य शासन इम्पोर्ट करणार आहे. पण शासनाला तसे अधिकार नाही. त्यामुळे पवार कोणत्या अधिकाराने बोलत आहेत, असाही प्रश्न आंबेडकर यांनी केला आहे.

Advertisement

त्यावर ‘मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुधा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील. अर्थात ही बाब प्रकाश आंबेडकरांच्या फार उशीरा लक्षात आल्याचे दिसते आहे’, अशी प्रतिक्रिया भातखळकर यांनी केली आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply