Take a fresh look at your lifestyle.

‘लिज्जत पापड’ची यशोगाथा : ८० रुपयांचे ८०० कोटी केले; वाचा सात महिलांच्या जिद्दीची कहाणी

पुणे :

Advertisement

आज गावोगावी महिला बचत गटाचे पेव फुटले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रगतीचा मार्ग सापडला. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. सक्षम झाल्या. मात्र, ज्यावेळी बचत गटाचे नावही नव्हते, अशा वेळी म्हणजे 60च्या दशकात 7 महिला एकत्र आल्या आणि त्यांनी जे उभे केले, ते पाहून आजही अनेकांची बोटे तोंडात जातात. आम्ही आज तुम्हाला अशा उद्योगाची माहिती देणार आहोत, जो अवघ्या ८० रुपयापासून सुरु झाला होता..हो ८० रुपयापासूनच!

Advertisement

‘लिज्जत पापड’ हे नाव तुम्ही ऐकले असेलच. मध्यमवर्गीयांच्या घरातचं काय, पण अगदी श्रीमंतांकडेही ‘लिज्जत पापड’ आवडीने खाल्ले जातात. आज हा ब्रँड मिलेनियर ब्रँड बनलाय.. साठच्या दशकात 7 महिलांनी एकत्र येऊन अवघ्या ८० रुपयात हा उद्योग सुरु केला होता. आज त्यांच्या 82 शाखा सुरू आहेत. आज या ब्रँडला 45 हजाराहून अधिक महिला जोडल्या गेल्यात.
करोडो रुपयांच्या कंपनीचा हा ब्रँड आज दिसत असला, तरी त्याची सुरुवात फारच रडतकडत झाली होती. 15 मार्च 1959 रोजी जसवंती बेन यांनी ‘लिज्जत पापड’ या संस्थेचा पाया रचला. या ब्रॅन्डचं खास वैशिष्ट्य म्हणजे महिलाचं कौशल्य. कोणतीही शिक्षणाची अट नाही. महिलांचं कौशल्य पाहून काम दिलं जातं. लिज्जत ब्रँड ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ या नावाने चालणारी एक सहकारी संस्था आहे.

Advertisement

महिला सक्षमीकरणात कायम आघाडीवर असणाऱ्या या ब्रॅन्डची सुरुवात 7 महिलांनी अवघ्या 80 रुपयांच्या भांडवलासह मुंबईतुन केली होती. पहिल्यांदा घराच्या छतावर पापडाची 4 पाकिटे तयार केली गेली. पहिल्याच वर्षी त्यांनी 6 हजार रुपये कमावले. 2002 पर्यंत त्यांचा टर्नओव्हर 10 कोटी रुपये झाला होता, तर 2018 साली या ब्रँडचा वार्षिक टर्नओव्हर 800 कोटीवर गेलाय.
केवळ महिलाच नव्हे, तर येथे पुरुषही काम करतात, पण त्यांच्यावर जबाबदारी ती फक्त दुकानातील सहाय्यक आणि ड्रायव्हरसारख्या पदाचीच! ब्रँडसोबत काम करणार्‍या महिला तिथल्या ब्रॅन्चमध्ये जाऊन पीठ आणि मसाल्यांचं ताजं मिश्रण घेऊन येतात. आपल्या घरीच पापड तयार करुन आणतात. हे पापड त्यांच्या गुणवत्तेसाठी ओळखले जातात. ज्याचं श्रेय केवळ इथे काम करणाऱ्या महिलांनाच जातं. ‘लिज्जत’सोबत काम करणाऱ्या महिला कमीतकमी दर महिना 12 हजार रुपये कमावतात.

Advertisement

कोरोनामुळे कितीतरी कंपन्यांनी कर्मचारी कपात किवा पगार कपात केली.. लिज्जत पापडांच्या विक्रीवरही परिणाम झाला. मात्र, या ब्रँन्डने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी केलेला नाही किंवा कोणालाही कामावरून काढले नाही. पापडांची किंमतही तितकीच आहे. 100 ग्रॅम पापडांची किंमत केवळ 31 रुपये आहे. सिंगापूरपासून अमेरिकेपर्यंत हे पापड पोहचले आहेत. ‘लिज्जत’ची ही ‘सक्सेस स्टोरी’ लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या ब्रँन्डवर लवकरच सिनेमा येत आहे.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply