Take a fresh look at your lifestyle.

अय्यो.. १५ वर्षे नोकरीवर गैरहजर, तरी घेतला ५ कोटींचा पगार; पहा कुठे झालाय हा प्रकार

पुणे :
महिनाभर काम केल्यावर हातात पगार पडतो. मध्यमवर्गीय व्यक्तीची तर महिनाअखेर अक्षरश ओढाताण होते. त्यात एक दिवस सुट्टी घ्यावी, तर बॉस अंगावर येतो. अर्थात, काही जण बॉसला पाणी लावून सुटी घेण्यात यशस्वी होतात. मात्र, कोणाला काहीही न सांगता सुट्टी घेतली, तर नोकरी गेलीच म्हणून समजा.. मात्र, एका महाभागाने चक्क १५ वर्षात एकही दिवस काम न करता, फुल्ल पगार घेतला. हे गोष्ट समोर आल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला..

Advertisement

इटलीतील एका रुग्णालयात हा अजब प्रकार घडला. इटलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं तब्बल 15 वर्षे दांडी मारली. एव्हाना खरं तर हॉस्पिटल प्रशासनाने त्याला कामावरून काढायला हवे होते. मात्र, उलट त्याऐवजी त्याला तब्बल 5 कोटी रुपये पगार दिला. विशेष म्हणजे, इतक्या वर्षात या गैरप्रकाराबद्दल व्यवस्थापनाला काहीही खबर नव्हती.

Advertisement

काही दिवसांपूर्वी दुसऱ्याच एका प्रकरणाचा तपास करताना, ही बाब पोलिसांच्या लक्षात आली नि अखेर या दांडीबहाद्दर माणसाचं बिंग फुटलं. कामावर गैरहजर राहण्याबाबत त्यानं कोणतीही नोटीस की अर्ज दिला नव्हता. जवळपास 2005 पासून तो कामावर गैरहजर होता. तब्बल 15 वर्षे बिनधास्त कामावर गैरहजर राहुन त्याने या काळात फुल्ल पगारही घेत राहिला. दर महिन्याला पगाराच्या दिवशी, त्याच्या खात्यात पैसे जमा होत होते.

Advertisement

Krushirang on Twitter: “Sony releases a more powerful wearable AC #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #corona #health #lifestyle #summer #cool https://t.co/CAJcZzbhlF” / Twitter

Advertisement

सुमारे 15 वर्षात तब्बल 5.38 लाख युरो, म्हणजेच भारतीय चलनानुसार त्याला सुमारे 4.8 कोटी रुपये पगार मिळाला. सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीत इतकी प्रदीर्घ रजा आणि पगार मिळवण्याचा विक्रम या व्यक्तीनं नोंदवला असून, त्याला आता ‘गैरहजर लोकांचा बादशहा’ म्हणून ओळखलं जात आहे. ‘दैनिक भास्कर’ने हे वृत्त दिलं आहे.

Advertisement

पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणलं, तेव्हा रुग्णालय अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. रुग्णालयाला चुना लावणाऱ्या या व्यक्तीचं वय आता 67 वर्षे आहे. त्याच्याविरुद्ध फसवणूक, खंडणी आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याच्याबरोबर रुग्णालयाच्या सहा व्यवस्थापकांवरही कारवाई करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्याने त्याच्याविरूद्ध शिस्तभंगाचा अहवाल दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवस्थापिकेला धमकावल्याचे समोर आले आहे. नंतर ही व्यवस्थापिका सेवानिवृत्त झाली आणि या कर्मचाऱ्यानं गैरहजर राहण्यास सुरुवात केली. फसवणूक आणि गैरहजर राहिल्याच्या दुसऱ्या एका प्रकरणाचा तपास करताना हा प्रकार समोर आला.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply