Take a fresh look at your lifestyle.

कुल न्यूज : गरमीने परेशान, मग एसी खिशात घालून फिरा..! वाचा तर खरं..!

पुणे :

Advertisement

आधुनिक तंत्रज्ञानात सतत काही ना बदल होत असतात. काही तर अशी संशोधने आहेत, की त्याचा अविष्कार कसा झाला असेल, याचा विचार करूनच तोंडात बोटे जातात. जगभरात अनेक थक्क करणाऱ्या अनोख्या आणि नव्या टेक्नोलॉजीची निर्मिती होत असते. मानवाचे श्रम कमी व्हावेत, कमी कष्टात, कमी वेळेत झटपट कामे व्हावीत, या उद्देशाने नवनवी संशोधने होत असतात. (Sony launches a new AC that you can wear under your shirt to keep you cool or warm)

Advertisement

उन्हाळ्यात घरात बसून घामाच्या धारा लागतात, मग बाहेर फिरायचे तर नावच नको.. मात्र, काही वेळा नाईलाज होतो आणि कामासाठी बाहेर पडावेच लागते. अशा वेळी कडक उन्हाने जीवाची काहिली होते. जीव मेटाकुटीला येतो. मात्र, अशा कडक उन्हातही तुम्ही थंडीने कुडकुडायला लागला तर.. अहो खरंच, आज आम्ही तुम्हाला अशाच “जो गर्मीमे थंड का एहसास’ देणाऱ्या एका संशोधनाबाबत माहिती देणार आहोत. ती वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही..

Advertisement

IndiaTodayTech on Twitter: “The wearable will help the user remain cool even during summer days https://t.co/ky0UdcjrQW” / Twitter

Advertisement

जगप्रसिद्ध सोनी कंपनीने असेच एक आश्चर्यकारक संशोधन केले आहे. सोनीने ‘वियरेबल्स एसी’ लॉन्च करुन एक रेकॉर्ड केला आहे. सोनीने तयार केलेला हा वियरेबल्स एसी मोबाईल फोनपेक्षाही छोटा आहे. तो तुम्ही आपल्यासोबत कुठेही घेऊन फिरू शकतो.

मोबाईल अँपने हा एसी कंट्रोल करता येतो. कंपनीने हा वियरेबल्स एसी (first-ever wearable Air Conditioner) मागील वर्षीच लाँच केला होता. त्याला त्यांनी ‘रिऑन पॉकेट’ (Reon Pocket) असे नाव दिले होते. तर या ‘रिऑन पॉकेट-2’ची जपानमध्ये किंमत 138 डॉलर, म्हणजे भारतीय रुपयानुसार जवळपास 14,850 रुपये आहे. भारतात अद्याप त्याच्या ‘लाँच’बाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
‘दी वर्ज’ (The Verge)च्या रिपोर्टनुसार, सोनीचा हा ‘वियरेबल्स एसी’ सिंगल चार्जमध्ये अनेक तास वापरला जाऊ शकतो. ‘रिऑन पॉकेट- 2’चं डिझाईन ‘रिऑन पॉकेट’शी मिळतं-जुळतं आहे. आधीच्या तुलनेत या ‘वियरेबल्स एसी’मध्ये दोन पटीने अधिक उष्णता शोषून तापमान कमी करण्याची क्षमता आहे. म्हणजेच कुलिंगच्या तुलनेत हा आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक पॉवरफुल आहे.

Advertisement

सोनीचा हा नवा ‘वियरेबल्स एसी’ नेकबॅकप्रमाणे गळ्यात घालता येतो. आधीच्या मॉडेलमध्ये एका खास ‘टी-शर्ट’सह तो गळ्यात घालावा लागत होता. मात्र, या नव्या ‘रिऑन पॉकेट – 2’मध्ये खास टी-शर्टची गरज लागणार नाही. उन्हाळ्यात स्पोर्ट्सची खास आवड असलेले लोक याचा वापर करू शकतात. याचा वापर आउटडोर खेळ क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळ खेळताना केला जाऊ शकतो. ( keep you cool in your daily commutes during summer)

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Juan Pizarro 🔻🎗 on Twitter: “@RealSexyCyborg I have the opposite problem, I’d buy this if it were sold in Europe https://t.co/kyefQNxdfo” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply