Take a fresh look at your lifestyle.

रोहित पवारांनी दाखवून दिली फडणवीसांची ‘ती’ चूक; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

पुणे :

Advertisement

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी किरकोळ-कारकोळ मुद्द्यावर महाविकास आघाडीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातच ते अनेकदा अडकतात आणि मग टीकेचे धनी ठरतात. आताही त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वांना मोफत करोना लस दिली जात असल्याचे सर्वसाधारण वाक्य म्हटले होते. मात्र, त्यातील वयाच्या अटीचा मुद्दा लक्षात घेतल्यास हे वाक्य अर्धसत्य होते. तीच चूक पकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्याबाबत ट्विटरवर लिहिले आहे.

Advertisement

पवारांनी म्हटले आहे की, सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी ‘केंद्र सरकार मोफत लसीकरण करत असून राज्यांवर लसीकरणाचा भार येणार नाही’, असं माध्यमांशी बोलताना आपलं वक्तव्य ऐकलं. कदाचित आपल्याकडून घाईत हे चुकीचं वक्तव्य झालं असावं. पण यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. पुढच्या ट्विटर पोस्टमध्ये पवारांनी म्हटले आहे की, १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना केंद्राकडून मोफत लस मिळणार नाही तर त्याचा भार राज्यांवरच असेल. #मन_कि_बात मध्ये आदरणीय पंतप्रधानांनी दिलेली माहिती आणि तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना बघितल्या तर हे लक्षात येईल.

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “सन्माननीय विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी ‘केंद्र सरकार मोफत लसीकरण करत असून राज्यांवर लसीकरणाचा भार येणार नाही’, असं माध्यमांशी बोलताना आपलं वक्तव्य ऐकलं. कदाचित आपल्याकडून घाईत हे चुकीचं वक्तव्य झालं असावं. पण यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. https://t.co/wzznx8doFv” / Twitter

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply