Take a fresh look at your lifestyle.

आणि पाकिस्तानच्या बाबर आझम याने विराट आणि फिंचला टाकले मागे..!

मुंबई :
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने टी २० क्रिकेटमध्ये २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो टी २० आंतरराष्ट्रीयमध्ये २ हजार धावा पूर्ण करणारा वेगवान फलंदाजही ठरला आहे. यामध्ये त्याने विराट कोहली, ॲरोन फिंचसारख्या फलंदाजांना मागे टाकले आहे. बाबरने ५२ व्या डावात आपल्या २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

Advertisement

विराट कोहलीने टी २० क्रिकेटमध्ये २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ५६ डावांचा सामना केला तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ॲरोन फिंचने ६२ डावांमध्ये २ हजार धावा पूर्ण केल्या. कोहली आणि फिंचला मागे टाकून बाबरने केवळ ५२ डावात हे विशेष स्थान गाठले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबर आझमने काही काळापूर्वी विराट कोहलीचा पहिल्या नंबरचा मुकुट काढून घेतला होता. बाबर आझम सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे, तर टी २० मध्ये फक्त डेव्हिड मालन त्याच्या पुढे आहे.

Advertisement

पाकिस्तान आणि झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांची टी २० मालिका सध्या १-१ अशी आहे. पहिल्या सामन्यात जिथे पाकिस्तानने नेत्रदीपक विजय नोंदविला होता, तेथे दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने बाबर आझमच्या संघाच्या संघाला हरवून सामन्यावर आपले नाव कोरले होते. ११९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ९९ धावांत आटोपला. पाकिस्तानविरुद्ध टी २० क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा हा पहिला विजयही होता.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply