Take a fresh look at your lifestyle.

म्हणून फ़क़्त 12 दिवसात तब्बल 9 लाख लोकांनी सोडलाय महाराष्ट्र; वाचा नेमके काय झालेत परिणाम

पुणे :

Advertisement

कोरोना साथीच्या आजाराने सर्वाधिक फटका कामगारांना बसला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, एप्रिलच्या फ़क़्त पहिल्या 12 दिवसांत सुमारे 9 लाख लोक महाराष्ट्रातून त्यांच्या आपापल्या राज्यात परत गेले आहेत. महाराष्ट्रात परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, आताही बहुसंख्य व्यापारी या मजुरांना रोखण्यास तयार नाही.

Advertisement

एसबीआयच्या अहवालानुसार, 1 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान पश्चिम रेल्वेच्या वतीने 4.32 लाख लोकांनी 196 रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करून आपले घर गाठले आहे. त्यापैकी 150 ट्रेन गाड्या फक्त उत्तर प्रदेश आणि बिहारला गेल्या आहेत. त्यातून 3.23 लाख लोक या दोन राज्यात परत गेले आहेत. एवढेच नाही तर मध्य रेल्वेने चालवलेल्या 336 गाड्यांमधून 4.70 लाख प्रवाशांनी (मजूर) महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात प्रवास केला आहे. या गाड्या उत्तर प्रदेश, बिहार तसेच आसाम, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांत गेल्या आहेत.

Advertisement

या अहवालानुसार मोठ्या प्रमाणात औद्योगिक उपक्रम असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात मिनी लॉकडाऊनचे गंभीर परिणाम होतील. सध्याच्या कडक नियमामुळे राज्याला 82 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते आणि येत्या काही दिवसांत यात वाढ झाल्यास तूट आणखी वाढविण्याची शक्यता आहे. अजीम प्रेमजी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अमिल बसोले यांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीच्या लॉकडाऊनदरम्यान कामगारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती बरीच खालावली असल्याने अनेकांची स्थिती बिकट आहे. त्यातच बऱ्याच दिवसानंतर पुन्हा काम सुरू झाल्यावर दुसरी लाट आली आणि मग मिनी लॉकडाऊन लागल्याने अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply