Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : जडेजाने इतिहास रचला; ‘त्या’ बॉलरला धुतले न एकाच षटकात ठोकल्या ‘इतक्या’ धावा..!

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ च्या १९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने २० षटकांत ४ गडी गमावून १९१ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजाने हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात चौकार आणि षटकारांसह पाऊस पाडला. त्याने या षटकात ५ सिक्सर आणि एक चौकार ठोकला.

Advertisement

आयपीएलमध्ये यापूर्वी ख्रिस गेलने २०११ मध्ये बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर कोची टस्कर्सविरुद्ध प्रशांत परमेश्वरनच्या षटकात तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. हर्षल पटेलने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग २० वे षटक टाकले. हर्षल त्याच्या लाईन व लेंन्थपासून भटकताना दिसला, ज्याचा जडेजाने पुरेपूर फायदा घेतला. जडेजाने अवघ्या २८ चेंडूत ६२ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार ठोकत या षटकात ३७ धावा कुटल्या. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने आरसीबीविरुद्ध ४ गडी गमावून १९१ धावा केल्या. जडेजा व्यतिरिक्त फाफ डुप्लेसिसनेही ५० धावांची शानदार खेळी साकारली.

Advertisement

1 over 37 runs: Jadeja’s record-equalling final-over carnage (iplt20.com)

Advertisement

या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाने उत्कृष्ट कामगिरी केली असून संघाने पहिला सामना गमावल्यानंतर सलग तीन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी आतापर्यंत आयपीएल २०२१ मध्ये एकही सामना गमावला नाही. या संघाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले आहेत.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply