Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : पहा देशातील कोवीड परिस्थीतीबाबत काय म्हणाला राजस्थानचा ‘हा’ अष्टपैलु खेळाडू

मुंबई :
राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस म्हणाला आहे की कोविड या साथीच्या रोगाची चर्चा त्याच्या संघात बऱ्याचदा झाली आहे. लोक साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेने पीडित असल्याने त्यांच्या वेदना जाणवू शकतात. भारतात रोज तीन लाखाहून अधिक कोरोना संसर्ग होण्याच्या घटना घडत आहेत आणि औषधे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हे संकट आणखीनच वाढले आहे. मॉरिस म्हणाला की, काय होत आहे हे समजणे कठीण आहे.

Advertisement

शनिवारी राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून मिळवलेल्या विजयानंतर मॉरिस म्हणाला, संघ म्हणून आम्ही गेल्या काही दिवसांत याबद्दल बरीच चर्चा केली. आपण पाहिले आहे की, भारतात काही भागांत या साथीचा किती वाईट परिणाम होत आहे. तो म्हणाला, काय होत आहे हे समजणे फार कठीण आहे. आपल्या चेहऱ्यावर हास्य घेऊन खेळण्याची आपली जबाबदारी आहे, कारण आपल्याकडे हसण्याचे कारण आहे आणि आम्ही निरोगी आहोत आणि आम्ही क्रिकेट खेळायला मिळत आहे.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉरिस म्हणाला, आम्हाला आशा आहे की, आम्हाला घरी पहात असलेल्या लोकांना आम्ही आनंदी करू. आपण सामना जिंकू किंवा गमवू, लोकांना आनंदी करण्याची ही संधी आहे. जर यामुळे लोकांना आनंदी राहण्याची संधी मिळाली तर एक खेळ म्हणून आम्ही चांगले काम करत आहोत, असे तो म्हणाला. कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध मॉरिसने २२ धावांत चार बळी घेतले. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने ४२ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने २४ धावा करून संघाला हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply