Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : राजस्थानला आणखी एक झटका; ‘हा’ खेळाडू यंदाच्या आयपीएलमधून बाहेर

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या समस्या संपण्याचे नाव घेत नाहीयेत. बेन स्टोक्सनंतर जोफ्रा आर्चर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि आता वेगवान गोलंदाज अँर्ड्यू टाय देखील या स्पर्धेतून माघार घेऊन ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. राजस्थानमध्ये आता परदेशी खेळाडू म्हणून केवळ चारच खेळाडू शिल्लक राहिले आहेत.

Advertisement

राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर हँडलवरून खुलासा केला आहे की, वैयक्तिक कारणास्तव अँर्ड्यू टाय याने आयपीएल २०२१ मधून आपले नाव मागे घेत ऑस्ट्रेलियामध्ये परतला आहे. राजस्थान संघासाठी हा मोठा धक्का आहे. अलीकडेच लियाम लिव्हिंगस्टोनने बायो-बबलमुळे होणाऱ्या थकव्याचे कारण सांगून घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे दुखापतीमुळे यापूर्वीच या टी २० लीगमधून बाहेर पडले आहेत.

Advertisement

Advertisement

दरम्यान, राजस्थानने अखेरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला ६ गडी राखून नमवून या मोसमातील दुसरा विजय नोंदविला आहे. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत केवळ २३ धावा देऊन चार बळी मिळवले. शुबमन गिल आणि कर्णधार इयन मॉर्गन धावबाद होत पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार संजू सॅमसनने शानदार फलंदाजी करत ४२ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानचा हा मोसमातील दुसरा विजय होता, तर केकेआरला पाचव्या सामन्यात सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाताची टीम आता पॉइंट टेबलच्या तळाशी पोहोचली आहे. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply