Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आली ‘ही’ वाईट बातमी

मुंबई :
आयपीएल २०२१ मध्ये आठही संघांदरम्यान जोरदार लढाई सुरू असून दिवसेंदिवस थरार वाढत आहे. तथापि, हंगामाच्या मध्यभागी चेन्नई सुपर किंग्जसाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडचे संचालक आणि अध्यक्ष एल.सबरत्नम यांचे आजारपणानंतर निधन झाले आहे.

Advertisement

एल. सबरत्नम ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी आहे. सबरत्नम आपल्यात आता नसल्याची माहिती त्यांच्या कौटुंबिक सूत्रांकडून मिळाली आहे. सबरत्नम बराच काळ चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक होते. याआधी ते चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे संचालक देखील होते. इतकेच नव्हे तर ते सबरत्नम इंडिया सिमेंट्सचे सल्लागार आणि कोरोमंडल शुगर्सचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते. 

Advertisement

Zee News Sports on Twitter: “#IPL सीजन के बीच में ही चेन्नई सुपर किंग्स के लिए बेहद बुरी खबर आई है #CSK #IPL2021 https://t.co/Iyi0QvpOpj” / Twitter

Advertisement

दरम्यान, या हंगामात चेन्नई संघाला सुर गवसल्याचे पहावयास मिळाले आहे. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघाने दमदार पुनरागमन करत चार विजय संपादित केले आहेत. आज रविवारी आरसीबीविरुध्द झालेल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा 69 धावांनी धुव्वा उडवला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply