Take a fresh look at your lifestyle.

टाटा-बिर्ला-बजाज-अंबानींना सरकारची मदतीची विनंती; राष्ट्रीय राजधानी ‘ऑक्सिजन’वर..!

दिल्ली :

Advertisement

दिल्लीत कोरोना संसर्गाची गती धोकादायक बनली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या आणखीनच वाढत असल्याने अवघी राष्ट्रीय राजधानीच आरोग्याच्या संकटात आहे. येथील सर्वच रुग्णालयांना दररोज ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितानाच देशातील बड्या उद्योगपती मंडळींनाही विनंती केली आहे.

Advertisement

अंबानी, टाटा, बिर्ला आणि बजाज यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. दिल्लीसाठी ऑक्सिजनची मदत त्यातून त्यांनी मागितली आहे. केजरीवाल यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘तुमच्याकडे ऑक्सिजन किंवा टँकर असल्यास दिल्ली सरकारला मदत करा. तुम्हाला जमेल त्या प्रकारे मदत करा. ‘ यापूर्वी केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. ज्यामध्ये त्याने त्यांच्याकडून ऑक्सिजनची मागणी केली होती.

Advertisement

ANI on Twitter: “Chief Minister Arvind Kejriwal writes a letter to the top industrialists of the country, seeking their help in the national capital’s Oxygen crisis. His letter reads, ‘Please help Delhi government if you have Oxygen and tankers…help us in whatever way you can.’ (File photo) https://t.co/ETCJ1biqj5” / Twitter

Advertisement

केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, ‘मी सर्व मुख्यमंत्र्यांना जास्त ऑक्सिजन असल्यास दिल्लीसाठी देण्याची विनंती करतो. तथापि, केंद्र सरकारही आम्हाला मदत करीत आहे. परंतु कोरोनाची तीव्रता अशी आहे की सर्व उपलब्ध संसाधने अपुरी असल्याचे सिद्ध होत आहेत. शनिवारीही दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे संकट कायम होते. ऑक्सिजनच्या अभावामुळे गंभीर कोरोना रुग्णांना राजधानीतील कोणत्याही रुग्णालयात स्थान मिळू शकत नाही. शुक्रवारी रात्री दिल्लीतील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये 20 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, मृत्यू झालेले सर्व 20 रुग्ण ऑक्सिजनवर होते. ऑक्सिजनच्या अभावामुळे आम्हाला प्रवाह कमी करावा लागला आणि ही दुर्दैवी घटना घडली.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply