Take a fresh look at your lifestyle.

हवामान अंदाज : पहा राज्यभरात कुठे पडू शकतो अवकाळी पाऊस

पुणे :

Advertisement

उन्हाचा कडाका आणि करोनाकहर यात आता अवकाळी पावसाची बातमीही आलेली आहे. पुढील चार दिवसात राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये चंदगड, नेसरी भागात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. तर, ठाणे जिल्ह्यातील शहारपूरमधील खर्डी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. 

Advertisement

दरम्यान, पुढच्या चार दिवसांत राज्याच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल व्यवस्थित ठिकाणी आणि काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. हवामानाचा अंदाज देताना वामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सूचित केलेले मुद्दे असे :

Advertisement
  1. दि. 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
  2. आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
  3. विदर्भ तसेच मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात उन्हाच्या झळा वाढल्या
  4. दि. 29 एप्रिलपर्यंत अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता. त्यामुळे खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा यासह अनेक ठिकाणी पाऊस होईल
  5. भारतासह महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

K S Hosalikar on Twitter: “Severe weather warnings issued by IMD today for coming 5 days for all India. Most of the central India and Southern Peninsula looks to remain active with possibilities of thunderstorms and lightning with rains. Including Maharashtra place. https://t.co/kDKHNnF47U” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply