Take a fresh look at your lifestyle.

विखेंच्या रेमिडीसिवीरवरून चर्चेला उधाण; बातम्यामधून वेगवेगळे आकडे आल्याने मुद्दा ट्रेंडमध्ये, पहा वास्तव

अहमदनगर :

Advertisement

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा एक व्हिडिओ कालपासून जोरात व्हायरल होत आहे. त्यात एका खासगी चार्टर्ड प्लेनने (विमान) डॉ. विखे यांनी रेमिडीसिवीर हे इंजेक्शन आणलेले आहेत. ते रेमिडीसिवीर आणून त्यांनी वाटलेही आहेत. तसेच एक व्हिडिओ व्हायरल करून डॉ. विखे यांनी स्वतःच याची माहिती सगळ्यांना दिलेली आहे.

Advertisement

जुना व्हिडिओ पोस्ट करून डॉ. विखे यांनी वैयक्तिक संबंधानुसार हे रेमिडीसिवीर इंजेक्शन आणल्याचे म्हटलेले आहे. पाच दिवसांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांनी ही माहिती दिल्याने अनेकांची उत्सुकता चाळवली आहे. अनेक माध्यम संस्था आणि इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल यांनी याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध करताना आकडेवारी वेगवेगळी सांगितली आहे. अगदी ५०० ते १० हजार रेमिडीसिवीर असा हा आकडा वाढत गेलेला आहे. विमानाने आणले म्हणजे खूपच जास्त आणले असणार असा ग्रह अनेकांचा झाल्याने हा घोळ झाल्याचे काहींना वाटत आहे.

Advertisement

Rupali Chakankar on Twitter: “खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे.1/2” / Twitter

Advertisement

डॉ. विखे यांनी शिर्डी कोविड रुग्णालय, प्रवरा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १०० इंजेक्शन्स दिलेले आहेत. त्याच्या अधिकृतरीत्या बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणलेल्या सर्व इंजेक्शनचे वाटप त्यांनी केलेले आहे. त्यामुळे एकूण ३०० इंजेक्शन त्यांनी आणल्याचे स्पष्ट होते. व्हिडिओमध्येही डॉ. विखे यांनी कुठेही आकडा दिलेला नाही. किंवा त्यावर बोललेले नाही. कसे आणले, कशासाठी आणले आणि यावर अजिबात राजकारण न करण्याचे आवाहन डॉ. विखे यांनी त्यात केलेले दिसते.

Advertisement

मात्र, अनेकांनी मोठे बॉक्स पाहून आकडा वाढवत नेल्याने असे झालेले असावे, असे विखे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला वाटत आहे. त्यांनी म्हटले आहे की, ३०० इंजेक्शन आणून वाटलेले आहेत. एकूणच आकडा नेमका कसा वाढला, हाच कळीच मुद्दा बनला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढून अनेकांनी प्रवरा संस्था आणि विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना इंजेक्शन मिळण्यासाठी फोनवर फोन करण्यास सुरुवात केली आहे. एकूणच आता यावर खासदार डॉ. विखे पाटील स्वतः कोणती भूमिका आणि आकडे सांगतात त्याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Rupali Chakankar on Twitter: “एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी.” / Twitter

Advertisement

विखेंनी व्हिडीओमध्ये म्हटलेले आहे की, मी गेलो फॅक्टरीत, तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही . माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही.

Advertisement

‘जेट विमानाने थेट दिल्लीहून दोन हजार रेमडेसिविर इंजेक्शन नगरमध्ये आणले’ असल्याची बातमी दिव्य मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. तर, टाईम्स नाऊ मराठी यावर डॉ. विखे यांनी तब्बल दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणले खास विमानाने नगरसाठी आणले होते. सुजय विखेंनी आणलेल्या बॉक्समध्ये नक्की इंजेक्शनेच होती ना? की आणखी काही होते? यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. चाकणकर यांच्या बातमीने या गोंधळात आणखी भर पडली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Dr. Vikhe Patil Video Link : https://fb.watch/55abhaWvNr/

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply