Take a fresh look at your lifestyle.

भयंकरच की..: निवडणूक भोवली; बंगालमध्ये करोनाकहर, प्रत्येक दुसरा व्यक्ती आहे कोविडबाधित..!

कोलकाता :

Advertisement

बंगालमध्ये आठ टप्प्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदारांनी लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपसाठी, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षासाठी दणक्यात प्रचारसभा घेतल्या. कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून राज्य ताब्यात घेण्यासाठीची जोरदार लढाई इथे रंगली. मात्र, आता त्याचे दुष्परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली आहे. करा, या राज्याच्या काही भागात प्रत्येक दोनपैकी एकजणाला करोनाबाधा झाल्याचे अहवाल येण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

देशभरात कोरोना विषाणूच्या साथीमुळे सर्वजण चिंतेत आहेत. अनेक राज्यात आरोग्य सेवा कोलमडू लागली आहे. पेशंटला ऑक्सिजनचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी उपचाराविना मृत्यूच्या खाईत ढकलले जात आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालमध्येही विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांच्या काळातच आता बंगालमध्ये कोरोनाच्या नोंदी येऊ लागल्या आहेत. राज्याची राजधानी कोलकाताची अवस्था बिकट झाली आहे. येथे कोरोनाची आरटी-पीसीआर परीक्षा घेत असलेल्या प्रत्येक दोनपैकी एक व्यक्ती पॉजिटिव असल्याचे दिसून आले. त्याच वेळी जेव्हा राज्य पातळीवर विचार केला जातो तेव्हा प्रत्येक चारपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉजिटिव येत आहेत. मागील महिन्यापेक्षा ही संख्या पाच पट जास्त आहे. एका महिन्यापूर्वी 20 कोरोना तपासणीत केवळ एका व्यक्तीचा अहवाल पॉजिटिव आढळत होता.

Advertisement

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार ही बातमी पुढे आलेली आहे. आरटी-पीसीआर चाचणी करणार्‍या प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये 45-55% पॉजिटिव रेट आहे. कोलकाता शहरात पॉजिटिव रुग्णांचे प्रमाण प्रत्यक्षात खूपच जास्त असल्याची भीती व्यक्त होत आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना सौम्य किंवा अजिबात लक्षणे नाहीत. तरीही त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉजिटिव येत आहे. बंगालमध्ये 1 एप्रिल रोजी 25,766 लोकांची कोरोना चाचणी घेतल्यावर त्यामध्ये केवळ 1274 लोक पॉजिटिव आढळले. हा रेट 4.9 टक्के होता. आता शनिवारी 55,060 लोकांची तपासणी केल्यावर त्यापैकी 14,281 लोकांची नोंद पॉजिटिव आढळली. हा दर 25.9 टक्के आहे. पीअरलेस हॉस्पिटलचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ भास्कर नारायण चौधरी म्हणाले की, वेगाने होणाऱ्या संसर्गामागील कारण म्हणजे नवा म्युटंट व्हायरस. अत्यल्प वेळात हा नवा विषाणू जास्तीतजास्त लोकांना संक्रमित करीत आहे.

Advertisement

काही ठिकाणी प्रयोगशाळेतील पॉजिटिव नमुन्यांचे प्रमाण 55 टक्क्यांपर्यंत गेले आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडणूक आयोग यावेळी आठ टप्प्यात निवडणुका घेत आहे. सातव्या टप्प्यातील मतदान उद्या (सोमवारी) होणार आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी विविध पक्षांचे नेते सतत सभा घेत राहिले. मोठ्या संख्येने सामान्य जनतेनेही त्याला प्रतिसाद दिला. नंतर निवडणूक सभा रद्द करण्याची मागणी केली गेली. अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपणहून सभा रद्द करून सुज्ञपणा दाखवल्यावर मग निवडणूक आयोगानेही पश्चिम बंगालमध्ये रोड शो आणि मोठ्या साम्भांवर त्वरित बंदी घातली आहे. मात्र, आता बैल गेला अन झोपा केला अशीच परिस्थिती याबाबत झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply