Take a fresh look at your lifestyle.

‘भाजप का ध्यान करोना नाही.. चुनाव की तरफ’; मुख्यमंत्री चौहान यांच्या वक्तव्यावर आव्हाडांनी केले हे ट्विट

मुंबई :

Advertisement

सध्या देशभरात करोनाचा कहर चालू आहे. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सामाजिक भान ठेऊन निवडणूक प्रचार स्थगित केल्यावर मग कुठे भाजपला याचे भान आलेले आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी काही प्रचारसभा घेऊन भाजपचे लक्ष्य निवडणूक असल्याचे दाखवून दिले होते. त्यावरून या पक्षावर टीका होत असतानाच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंग चौहान यांनी ‘भाजप का ध्यान करोना नाही.. चुनाव की तरफ’ असल्याचे चुकून म्हटले आहे.

Advertisement

आज तक नावाच्या वृत्तवाहिनीवर त्यांनी असे म्हटलेले आहे. प्रभू चावला यांनी ही मुलाखत घेतलेली आहे. त्यात चौहान म्हणत आहेत की, ‘अच्छे परिणाम आयेंगे.. लेकीन इस समय परिणामो की तरफ हमारा ध्यान नही है.. हमारा ध्यान है चुनाव की तरफ.. ये.. चुनाव की तरफ नही है.. करोना को कंट्रोल करने की तरफ है..’ अशा पद्धतीने चौहान यांनी चुकून का होईना मात्र, भाजपचे खरे लक्ष्य कोणते आहे आणि त्यांनी कशावर फोकस केलेला आहे. हेच स्पष्ट झाल्याची टीका होण्यास सुरुवात झालेली आहे.

Advertisement

Dr.Jitendra Awhad on Twitter: “शिवराज चौहान मुख्यमंत्री मध्यप्रदेश चुकून बोलले, हमारा ध्यान कोराना का तरफ नहीं चुनाव की तरफ हैं https://t.co/xfBFO4aX5N” / Twitter

Advertisement

मुख्यमंत्री चौहान हे बोलताना चुकलेले आहेत. मात्र, राजकीयदृष्ट्या त्याचा फायदा घेण्याच्या हेतूने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हीच व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. ही कट-पेस्ट-कट केलेली आहे किंवा नाही, हेही समजू शकलेले नाही. मात्र, आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, शिवराज चौहान मुख्यमंत्री मध्यप्रदेश चुकून बोलले, हमारा ध्यान कोराना का तरफ नहीं चुनाव की तरफ हैं..

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply