Take a fresh look at your lifestyle.

त्यासाठी देशात छापली होती शून्य रुपयाची नोट; पहा त्याची ही ‘इंटररेस्टिंग’ कहाणी..!

मुंबई :

Advertisement

आतापर्यंत आपण १, २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५००, १००० आणि २००० रुपयांच्या नोटा पाहिल्या असतील. देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि काळा पैसे बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीतून हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर रंग-बेरंगी कलरफुल नवीन नोटा आल्या. पण, तुम्हाला माहित का, आपल्या देशात शून्य रुपयाचीही नोट छापली गेली होती.. अहो खरंच..! चला तर पाहू या, कशासाठी ही नोट छापली होती, तिचा कशासाठी वापर झाला..

Advertisement

दक्षिण भारतात, म्हणजे तमिळनाडूत ‘5 th Pillar’ (पाचवा स्तंभ) नावाची एक ‘एनजीओ’ (स्वयंसेवी) संस्था आहे. 2007 मध्ये या संस्थेने ही शून्य रुपयांची नोट छापली. जुनी ५० रुपयांची नोट आहे, त्या स्टाईलमध्येच (रंग, आकार) ही नोट होती.. एक नव्हे, तर अशा कोट्यवधी नोटा छापल्या होत्या, तेही हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) याबाबत कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. त्यामुळे ‘आरबीआय’चा यात कोणताही सहभाग नव्हता.
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरूद्ध लोकांना जागरूक बनविणे, असा हेतू ही शून्य रुपयाची नोट छापण्यामागे होता. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरूद्धच्या लढाईत शून्य रुपयांच्या नोटेलाच शस्त्र बनविण्यात आले होते. वेगवेगळ्या भाषांमध्ये छापलेल्या या नोटांवर असे लिहिले होते, की ‘जर तुम्हाला कोणी लाच मागत असेल, तर त्यांना ही नोट द्या आणि आम्हाला कळवा..!’

Advertisement

एकट्या तमिळनाडूमध्ये 25 लाखाहून अधिक नोटा वितरित करण्यात आल्या होत्या. देशभरात अशा सुमारे 30 लाखांच्या नोटा वितरित करण्यात आल्या होत्या. ‘5th Pillar’ या संघटनेने शून्य रुपयांची नोट छापून देशातील भ्रष्टाचाराविरूद्ध एक वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता.
‘5th पिलर’ संस्थेचे संस्थापक विजय आनंद यांनी या मोहिमेची सुरुवात केली. त्यांनी आपल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनपासून प्रत्येक चौका-चौकात आणि बाजारपेठेत शून्य रुपयांच्या नोटांचे वितरण केले होते. अर्थात, त्यामुळे काळा पैसा भष्टाचार निर्मूलन किती झाले, हे काही सांगता येणार नाही..
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply