Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची बातमी : शुद्ध मधासाठी कोर्टात सुनावणी; ‘चिनी शुगर सिरप’युक्त मधाची सर्रास विक्री

दिल्ली :

Advertisement

मध हे एक नैसर्गिक आणि शुद्ध असे अन्न आहे. मात्र, या मधाची कमतरता आणि मागणी लक्षात घेऊन अनेक बड्या कंपन्यांनी चक्क त्यात चिनी शुगर सिरपची भेसळ करून विकायला सुरुवात केली आहे. अवघ्या भारत देशात सध्या अशाच भेसळयुक्त मधाची विक्री होत असल्याचे विज्ञान व पर्यावरण केंद्राने निदर्शनास आणले होते. त्यावरच आता कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे.

Advertisement

बनावट मधाच्या विक्रीवर बंदी घालण्याबाबतची एक जनहित याचिका दाखल करण्यात अाली अाहे. यावर मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यासाठी बनावट मधाच्या विक्रीबद्दल सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र अाणि राज्य सरकारकडून उत्तर मागवले अाहे.

Advertisement

शुद्ध मध कधीच पाण्यात सहज विरघळत नाही. अस्सल मध पाण्यात टाकल्यावर तो खाली जाऊन बसतो. जाेपर्यंत पाणी ढवळणार नाही ताेपर्यंत तो मिसळला जाणार नाही. हे विज्ञान व पर्यावरण केंद्राने म्हटलेले आहे. या संस्थेने गेल्या वर्षी मधाची तपासणी केल्यानंतर सर्व ब्रँडच्या मधामध्ये चिनी शुगर सिरपची भेसळ करण्यात येत असल्याचा धक्कादायक खुलासा समाेर अाला होता. या याचिकेच्या निमित्ताने आता देशभरात भेसळमुक्त मध लवकरच सर्वांना चाखायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply