Take a fresh look at your lifestyle.

म्हणून आपला रुपया घसरतोय हो..; पहा ‘ही’ आहेत याची कारणे..!

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेले भारतीय रुपयाचे (Indian Rupees) अवमूल्यन काही केल्या थांबताना दिसत नाही. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून तर भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा रुततच चालला आहे. भारतीय रुपयाची किंमत ७५ रुपयांची पातळी ओलांडत एवढा घसरला, की तुर्की, रशिया आणि ब्राझीलमधील सेंट्रल बँकांप्रमाणे ‘आरबीआय’नेही (RBI / Reserve Bank of India) वेगळी भूमिका स्वीकारली. भारतीय चलनातील हा कमकुवतपणा आणखी काही काळ तरी कायम राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

आर्थिक बाजारात एप्रिलमध्ये अस्थिरता होती. रुपयाचे मूल्य १.५ टक्क्यांहून जास्त घसरले. या महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीदेखील अनुक्रमे ४.५ ते ३.३ टक्क्यांनी घसरले. याउलट अमेरिकन डॉलर निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला, तर एस अँड पी (S and P) ५०० ने या महिन्यात ४ टक्क्यांचा नफा कमावला. लवकरच रुपया ७६ ची पातळी ओलांडेल, असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडच्या रिसर्च अनॅलिस्ट-करन्सीच्या हीना नाईक यांनी व्यक्त केले.
भारतात त्सुनामीच्या वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अनेक राज्यांत कडक निर्बंध आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी, एका अहवालनुसार, परकीय गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये भारतीय बाजारातून सुमारे ४,६१५ कोटी रुपये काढले आहेत.

Advertisement

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाने बाजारातील या खेळीत मोठी भूमिका बजावली. समितीने रेपो दर ४ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. सेंट्रल बँकेनेदेखील कर्जावरील खर्च करण्याकरिता, तसेच अर्थव्यवस्थेतील सुधारणेस बळ देण्याकरिता आर्थिक वर्ष २०२२ मधील पहिल्या तिमाहीत १ लाख कोटी रुपयांपर्यंतचे बाँड खरेदी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे स्वतंत्र कर्जबाजारात (bank loans) सुटकेची लाट पसरली.
६ एप्रिल २०२१ रोजी १० वर्षांच्या भारतीय बेंचमार्कचे उत्पन्न ६.१२ टक्क्यांवर होते. रिझर्व्ह बँकेने कर्ज खरेदीचे स्पष्ट आश्वासन दिल्यानंतर, 10 वर्षांच्या भारतीय बेंचमार्कचे उत्पादन दोन दिवसातच ६.०१ टक्क्यांपर्यंत घसरले. दुसरीकडे, भारतीय रुपयाची किंमत ७५ रुपयांची पातळी ओलांडत एवढा घसरला, की तुर्की, रशिया आणि ब्राझीलमधील सेंट्रल बँकांप्रमाणे ‘आरबीआय’नेही वेगळी भूमिका स्वीकारली. रुपयाचे मूल्य वाढण्याची अपेक्षा असलेल्या अनेक ट्रेडर्सनी (money market traders) सुरुवातीला पाठींबा दिला. मात्र, धोरण जाहीर झाल्यानंतर, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (investors) त्यांच्या काही पोझीशन्स सोडून दिल्या. यामुळे चलनमूल्यात घसरण झाली.

Advertisement

एप्रिल-२०२१ मध्ये ‘आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन’ असे संबोधले गेल्याचे हीना नाईक यांनी नमूद केले. आरबीआय, सरकारी मालकीच्या बँकांमार्फत सातत्याने रुपयातील अस्थिरता कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, त्यांनाही काही मर्यादा आहेत. अनेक शीर्ष बँका आणि ब्रोकरेज हाऊसनी वित्तवर्ष २०२२ मध्ये भारताचा जीडीपी कमी असण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे स्थानिक इक्विटी आणि भारतीय रुपयावर परिणाम करणारी पुढील पुनरावृत्ती टाळण्यासाठी देशातील कोविड-१९ च्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणे, देशासाठी खूप आवश्यक आहे.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply