Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आणि ‘झी’चे सुभाष चंद्रा कर्जात बुडाले; पहा काय ही वेळ आलीय..!

मुंबई :

Advertisement

‘झी इंटरटेन्मेण्ट’च्या (Zee Entertainment) वाहिन्या पाहत असाल, तर त्यावर तुम्ही कधी तरी एस्सेल समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा (Chairman Mr. Subhash Chandra) यांना पहिले असेलच.. सध्या ते कर्जाच्या खाईत अडकले आहेत. ऑक्टोबर-२०१९ मध्ये एस्सेल समूहावर (Essel Group) सात हजार कोटींचे कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून समूहावर चक्क मालमत्तांची विक्री करण्याची वेळ आलीय. तरीही कर्जाचा (Bank Loans) डोंगर कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सुभाष चंद्रा मोठ्या संकटात सापडले आहेत. पतपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी त्यांना अखेर ‘डीश टीव्ही’चे (Dish TV) शेअर गहाण ठेवावे लागले आहेत.

Advertisement

मदतीसाठी बंधू धावले!
एस्सेल समूहाचे अध्यक्ष आणि झी एंटरटेनमेंटचे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी चंद्रा यांचे बंधू व ‘डीश टीव्ही’चे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक जवाहर गोयल यांनी ‘डीश टीव्ही’चे शेअर गहाण ठेवले आहेत. चंद्रा यांच्या समूहाचा पतपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी ‘डीश टीव्ही’चे शेअर गहाण ठेवल्याचे ‘झी एंटरटेनमेंट’ने म्हटलं आहे.

Advertisement

झी समुह कर्जात बुडाल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यावर ‘झी एंटरटेनमेंट’ने खुलासा केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सुभाष चंद्रा यांच्यावरील कर्जाबाबत हमी म्हणून ‘डीश टीव्ही’चे शेअर गहाण ठेवल्याचे कंपनीने म्हटलं आहे. लवकरच कर्जफेड करून ‘डीश टीव्ही’चे गहाण ठेवलेले शेअर सोडवले जातील, असा विश्वास सुभाष चंद्रा यांच्या समूहाने व्यक्त केला आहे.

Advertisement

‘डीश टीव्ही’चे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक जवाहर गोयल यांनी शेअर गहाण ठेवून केलेल्या सहकार्याबद्दल सुभाष चंद्रा समूहाने आभार व्यक्त केले आहेत. ‘डी टू एच’ सेवा पुरवठादारांपैकी ‘डीश टीव्ही’ प्रमुख कंपनी आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सुभाष चंद्रा यांच्याकडून कर्जफेड न झाल्यास ‘डीश टीव्ही’वरील गोयल यांचे नियंत्रण संपुष्टात येण्याचा धोका आहे.

Advertisement

चंद्रा यांचा एस्सेल समूह गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी कंपनीने मालमत्तांची विक्रीही केली. नोव्हेंबरमध्ये कंपनीने दोन टोल वे नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंडला (National Investment & Infrastructure Fund) दोन हजार कोटींना विकले होते.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply