Take a fresh look at your lifestyle.

ऑक्सिजन व सरकार अस्थिरतेच्या मुद्द्यावर ‘महाविकास’ने केले गंभीर आरोप

पुणे :

Advertisement

रेमडेसिविर, ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात केंद्र शासनाकडून दुजाभाव केला जात आहे. तसेच भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये भाजप कधीही यशस्वी होणार नाही, असे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी म्हटले आहे.

Advertisement

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात म्हटले आहे की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून ईडी, सीबीआय यांचा वापर केला जात आहे. देशमुख यातून निर्दोष सुटतील असा मला विश्वास आहे. का पत्राच्या आधारे एवढी मोठी कारवाई होऊ शकते का? अंबानीप्रकरणी मी विचारणा केली होती की त्यांच्या घरासमोर स्फोटके का ठेवली? कुणी ठेवली? कशासाठी ठेवली? त्याचा तपास मात्र सचिन वाझेला अटक होऊनही संपलेला नाही.

Advertisement

तर, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत केंद्र शासनाला माहिती आहे, तरीही रेमडेसिविर, ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात केंद्र शासनाकडून दुजाभाव केला जात आहे. केंद्र सरकारने राज्याकडे माणुसकीच्या नात्यातून पाहावे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने ऑक्सिजन व रेमडेसिविरची मागणी केंद्राकडे केली होती. ही मागणी रास्त आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply