Take a fresh look at your lifestyle.

बाजरी | पिक व्यवस्थापनाचे महत्वाचे मुद्दे; पहा बियाणे व लागवडीबाबतच्या टिप्स

महाराष्ट्रात मुख्यत्वे खरीप हंगामात बाजरी हे पिक घेतले जाते. काही भागात उन्हाळी हंगामातही बाजरीचे पिक घेतात. मात्र, उन्हाळी बाजरीचे क्षेत्र खूप कमी असल्याने एकूण उत्पादनातील वाटाही कमीच आहे. या लेखात आपण बाजरी पिक व्यवस्थापनाचे मुद्दे पाहणार आहोत.

Advertisement
 • बाजरी पिकाच्या संकरीत जाती : बाजरी पिकाच्या श्रद्धा, सबुरी, शांती, आदीशक्ती या संकरीत जातीच्या महाराष्ट्रात लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.
 • बाजरी पिकाच्या सुधारित जाती : आय. सी. टी. पी.– ८२०३, आय.सी.एम.व्ही.- २२१,समृद्धी, धनशक्ती व परभणी संपदा या बाजरी पिकाच्या सुधारित जाती आहेत.
 • बाजरीच्या संकरित जाती व सुधारित जातीमध्ये फरक : संकरित जाती तयार करण्यासाठी दोन भिन्न जातींचा संकर करून मादी वाणावर तयार झालेल्या बियाण्यास संकरित वाण/जात म्हणतात.अशा संकरित वाणामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता असते. तसेच पीक एकसारखे दिसते. सुधारित वाण चांगले गुणधर्म धारण केलेल्या झाडांची निवड करून त्यांना विलगीकरण अंतरात परागीभवन करून तयार केले जातात. असे वाणांचे पीक एकसारखे दिसत नाही. या सुधारित वाणांचे बियाणे दोन – तीन वर्षापर्यंत वापरता येते. मात्र संकरित वाणांचे बियाणे दरवर्षी नविन घ्यावे लागते. कारण त्या बियाण्यातील संकरित जोम हा फक्त पहिल्या पिढीपुरताच मर्यादित असतो. त्यामुळे दरवर्षी संकरित वाणांचे बियाणे नवीन विकत घ्यावे.

बाजरी पिकाच्या लागवडीसाठी संकरित व सुधारित जातीचा वापर करावा. बाजरी पिकाच्या संकरित व सुधारित वाणाचा वापर जमिनीच्या मगदुराप्रमाणे हवामान व पाऊस यांचा एकत्रितपणे विचार करून करावा. उदाहरणार्थः हलक्या जमीनीत कमी व अनियमित पावसाच्या क्षेत्रात सुधारित वाण चांगल्या तन्हेने तग धरू शकतात. हलक्या ते मध्यम जमीनीत व मध्यम पाऊस असलेल्या क्षेत्रात संकरित व सुधारित या दोन्ही जाती चांगले उत्पादन देतात परंतु ज्या क्षेत्रात पाऊस बरा पडतो व ऑगस्ट महिन्यामध्ये ही पावसाचा ताण पडत नाही अशा ठिकाणी मध्यम काळ्या जमीनीत संकरित वाण सरस ठरतात.

Advertisement
 • श्रद्धा या वाणांची वैशिष्ट्ये : श्रद्धा हा वाण लवकर पक्व देणारा, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, टपोरे व हिरवे दाणे असलेल्या कणसावर कमी अधिक प्रमाणात केस असल्यामुळे पाखरांपासून संरक्षण मिळते. हा वाण अवर्षणप्रवण क्षेत्रातसुद्धा स्थिर उत्पादन देतो. हा वाण ७० ते ७५ दिवसात तयार होऊन सरासरी २५-२६ क्चिंटल / प्रति हेक्टरी उत्पादन देतो.
 • शांती वाणाबद्दल माहिती : शांती हा वाण मध्यम उंचीचा असल्यामुळे जमिनीवर लोळत नाही. दाणे टपोरे व राखाडी रंगाचे असल्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो. कणीस मध्यम घट्ट असून या वाणाच्या भाकरीला चांगली चव आहे. शिवाय हा वाण गोसावी रोगास प्रतिकारक्षम आहे. हा वाण ८०-८५ दिवसात पक्व होऊन सरासरी २८-३० क्विंटल उत्पादन/ (प्रतिहेक्टरी) देतो.
 • बाजरी पिकाच्या आय टी. सी. पी. ८२०३ या वाणाची माहिती : हावाण ७५ ते ८०  दिवसात तयार होऊन सराररी १५ ते २० क्विंटल  प्रति हेक्टरी उत्पादन देतो. केस जाड घट्ट असून दाणे टपोरे राखाडी रंगाचे असून हा वाण गोसावी रोगास प्रतिकारक्षम आहे.
 • समृध्दी व परभणी संपदा जातीबद्दल माहिती : समृध्दी ही बाजरी पिकाची सुधारीत जात ८० दिवसात पक्व होऊन सरासरी २२—५ क्विंटलउत्पादन देते. या वाणावे दीणे टपोरे, राखाडी रंगाचे असून हा दण। गोसावी सोगास प्रतिकारक्षम आहे. कणीस घट्ट असून टोकाकडे निमुळते होते. परम । संपदा हा वाण ७५ ते ८० दिवसात तयार होऊन सरासरी प्रति हेक्टरी २२-२, কিचटल उत्पादन देतो. या वाणाचे दाणे टपोरे असून कांड्यांवरील सा हा फिकट गुलाबी असतो. हा वाणसुध्दा गोसावी रोगास प्रतिकारक्षम आहे.

महाराष्ट्रात लागवडीसाठी खाजगी क्षेत्रातील संकरित वाणांची शिफारस याबाबतचे मुद्दे :

Advertisement
 • उत्तर महाराष्ट्रात लागवडीसाठी पी.बी. १०६, बी. -२३०१ तसेच ८६ एम ६४ या खाजगी । क्षेत्रातील संकरित वाणांची शिफारस करण्यात आली आहे.
 • उन्हाळी हंगामासाठी जाती : उन्हाळी हंगामात ओलीताची सोय असलेल्या भागात श्रध्दा, सबुरी, शांती वधनशक्ती हे सर्व वाण चांगले उत्पादन देतात.
 • उन्हाळी हंगामासाठी खाजगी क्षेत्रातील कोणत्या संकरित वाणांची शिफारस : बायर ९४४४ व ८६, एम ६४ या संकरित वाणाची उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस केली आहे.
 • बाजरी पिकांचे संकरित बियाणे खरेदी करताना घेण्याची काळजी : बाजरी पिकाचे संकरित बियाणे खरेदी करतांना प्रमाणित बियाणे खरेदी करावे वत्यावरील मोहोर (टॅग) वरील उगवणक्षमता व अनुवांशिक शुध्दतेची खात्री करून घ्यावी. तसेच पीक लागवडीनंतरही प्रमाणित बियाण्याची पिशवी व मोहोर (टॅग) सांभाळून ठेवावे.

++++++++++++

Advertisement

स्त्रोत :
पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : aticmpkv@rediffmail.com
पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply