Take a fresh look at your lifestyle.

म्हणून आमदार मोहिते पाटलांवरचा हनी ट्रॅप फसला; पहा नेमके काय होते प्लॅनिंग

पुणे :

Advertisement

राजकारण, शारीरिक संबंध आणि पैसा याच्यासाठी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यातून झालेली अनेक गुन्हेगारी प्रकरणे रोज उघडकीस येत असतात. आताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना हनी ट्रॅपमध्ये फसवून बदनामीची भीती दाखवून पैसे उकळण्याचा डाव उघडकीस आलेला आहे. संबंधित तरुणीचा ‘खुद का जमीर’ जागा झाल्याने हा प्रयत्न फसला असून उलट कट रचणाऱ्या मंडळींना आता तुरुंगात जावे लागणार आहे.

Advertisement

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना फसवण्याचा हा कट शैलेश शिवाजी मोहिते पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन कांडगे (रा. चाकण, जि. पुणे) आणि सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) यांनी रचला होता. या आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत. त्यामुळे हा प्रकार फ़क़्त पैशांसाठी होता की त्याला वेगळे काही राजकीयदृष्ट्या कंगोरे होते, हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

तिघांनी संबंधित तरुणीची साताऱ्यात गाठ घेतली होती. त्यांनी तिला सांगितले होते की, आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायचा प्लॅन आहे. त्यासाठी तुझी मदत पाहिजे. त्यांच्या पुतण्याच्या माध्यमातून आमदारांकडे नोकरी मागण्यासाठी जायचे आणि त्यांच्याशी घसट वाढवायची.  आमदारांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मग पोलिसांत तक्रार दाखल करून बदनामीची भीती घालायची. त्यानंतर आमदाराकडून मोठे पैसे घेऊन त्याबदल्यात पुण्यात फ्लॅट घेऊन देण्याचे आमिष शैलेश मोहिते व राहुल कांडगे यांनी दाखवले होते. १२ एप्रिल रोजी संबंधित तरुणीसमवेत साताऱ्यात ही भेट झाली होती.

Advertisement

मात्र, तरुणीच्या मनाला ही गोष्ट न रुचल्याने तिने याबाबतची माहिती आ. मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते पाटील यांना दिली. यानंतर मयूर यांनी तत्काळ याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याचा तपास सुरू केला असून याचे वास्तव कंगोरे त्यातून पुढे येतील.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply