Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून रोहितला राग झाला अनावर; पहा त्याने नेमके काय केले मग

मुंबई :

Advertisement

पंजाबविरुद्ध सामन्यात रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील ४०  वे अर्धशतक ठोकले. मुंबईच्या डावाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये रोहितला बाद घोषित करण्यात आले. वास्तविक,  मोईसेस हेनरिक्सचा चेंडू लेग साइडच्या बाहेर जात होता, यावर रोहितने खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या पायाला लागून विकेटकीपरकडे गेला. यावर पंजाबच्या खेळाडूंनी बाद होण्याचे अपील केले. अंपायरने तातडीने हिटमॅनला बाद ठरवले. त्यानंतर रोहितने डीआरएस घेऊन पंचांची चूक सुधारली. पण या दरम्यान रोहित पंचावर भडकलेला दिसला.

Advertisement

रोहितने ५२  चेंडूत ६३  धावांची खेळी खेळली. रोहितने ५  चौकार आणि २  षटकार लगावले. स्क्वेअर लेगच्या हद्दीत रोहितला शमीने झेलबाद केले. त्याच्या अर्धशतकाच्या खेळीदरम्यान रोहितने सलामीवीर म्हणून आयपीएलमध्ये दीड हजार धावादेखील पूर्ण केल्या,  त्याव्यतिरिक्त, कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये ५० पेक्षा अधिक धावा करण्याची ही त्याची २३  वी वेळ आहे. त्यामुळे रोहितने धोनीचा विक्रम मोडला आहे.

Advertisement

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून २२  वेळा ५०  धावा करण्यात धोनीला यश आले आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक वेळा कर्णधार म्हणून ५० पेक्षा जास्त  धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये कोहलीने ३८  वेळा कर्णधार म्हणून ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गंभीरने कर्णधार म्हणून ३१ वेळा तर वार्नेरने २६ वेळा असा विक्रम केला आहे. सध्या रोहित शर्मा आयपीएलमध्ये धवननंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply