Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : गंभीरची संजू सॅमसनवर टीका; विराट आणि एबीकडून ‘ते’ शिकण्याचा सल्ला

मुंबई :

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल २०२१)  चांगली टीम असूनही राजस्थान रॉयल्स संघर्ष करत आहे. त्यांची टॉप ऑर्डर फेल जात असून कर्णधार संजू सॅमसनच्या कामगिरीची अनियमितता संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. संजू सॅमसनने पंजाबविरुद्ध शतकी खेळी करत शानदार सुरुवात केली होती, परंतु पुढील तीन सामन्यात तो फ्लॉप ठरला. या सामन्यात संजूने ४, १ आणि २१ धावांची खेळी केली. खरं तर शतकानंतर अशा कामगिरीची राजस्थानच्या व्यवस्थापनाने आणि संजूच्या समर्थकांनीही अपेक्षा केली नसेल. माजी क्रिकेटपटूंनी सॅमसनवर टीका केली असून माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्यानंतर आता माजी सलामीवीर गौतम गंभीरने संजूवर टीका केली आहे.

Advertisement

गंभीरने एका खासगी वेबसाइटला सांगितले की,  संजू सुरुवात अशी करतो कि असे वाटते तो आयपीएलमध्ये ८०० ते ९००  धावा हंगामात करेल,  परंतु त्याची कामगिरी खूप वेगाने घसरली आहे. गंभीरने संजूला ३० ते ४० धावा करण्यावर जोर दिला आहे आणि राजस्थानच्या कर्णधाराने विराट कोहली आणि एबी डीविलियर्सकडे पाहिले पाहिजे,  जे चांगले कामगिरी करत आहेत, असे गंभीर म्हणाला.

Advertisement

 माजी सलामीवीर म्हणाला की,  सॅमसनला योगदान द्यावे लागेल. मी आधी सांगितले आहे की कामगिरीचा आलेख इतका खाली येवू नये. शतक ठोकले तरी संजूला अद्याप स्कोअरिंग सुरू ठेवणे गरजेचे आहे. एबी आणि विराटकडे पाहा. हे खेळाडू शतक ठोकतील आणि त्यानंतरच्या सामन्यात ४० ते ५०  धावांचा डाव खेळतील.  गौतम म्हणाला की,  संजूने शतक ठोकल्यानंतर काहीच केले नाही. कदाचित सॅमसन आणखी शतक ठोकेल,  परंतु जागतिक दर्जाच्या आणि महान फलंदाजांच्या बाबतीत असे घडत नाही. मी असे म्हणत नाही की सॅमसनने प्रत्येक सामन्यात शतक ठोकले पाहिजे, परंतु प्रत्येक सामन्यात त्याने थोडे योगदान द्यावे.

Advertisement

राजस्थानच्या कर्णधारपदी एकतर संजू अधिक परिपक्व होईल किंवा कदाचित त्याची कारकीर्द दुसर्‍या दिशेने जाईल. आर्चर आणि बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत,  त्याच्यासाठी आणखी प्रगल्भ होण्याची ही चांगली संधी आहे. संजू हा संघाचा नियमित सदस्य नसून त्याला कर्णधारपदाची संधी देण्यात आली आहे. आणि यामुळे त्याच्या कारकीर्दीवर सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रभाव पडतात, असे गंभीर म्हणाला.

Advertisement

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply