Take a fresh look at your lifestyle.

म्हणून CBI ने PPE कीटमध्ये टाकलेत छापे; पहा नेमके काय केले जातेय कार्यवाहीत

मुंबई :

Advertisement

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) टीमने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या मुंबईसह अनेक ठिकाणच्या घरांवर एकाचवेळी छापेमारी सुरू केली आहे. त्यासाठी सीबीआय टीमने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीपीई कीट घातलेले आहे. सध्या करोना विषाणूचे स्प्रेडींग जोरावर असताना खबरदारीचा उपाय म्हणून ही काळजी घेतली जात आहे.

Advertisement

देशमुख यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यासह अनेक ठिकाणी छापेमारी चालू आहे. प्रकरणात यापूर्वीच देशमुख यांचे दोन स्वीय्य सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांचीदेखील 10 तास चौकशी करण्यात आलेली आहे. तसेच देशमुख यांचीही 11 तास चौकशी केली होती. 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरून एफआयआर दाखल झाल्यानंतर या कार्यवाहीला वेग आलेला आहे.

Advertisement
Source : https://divyamarathi.bhaskar.com/

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसुलीचा आरोप केल्याने ही कारवाई केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणाची सुनावणी करत सीबीआयला 15 दिवसांच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिल्यावर काही वेळातच देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याजवळ सोपवला होता. त्यानंतर आता सीबीआयने माजी गृहमंत्र्यांविरुद्ध एफआयआर देखील दाखल केला आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply