Take a fresh look at your lifestyle.

CBI धाडसत्रानंतर देशमुखांनी दिली पहिली प्रतिक्रिया; पहा काय म्हटलेय त्यांनी

मुंबई :

Advertisement

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या मासिक 100 कोटी वसुलीच्या आरोपप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो सध्या माजी गृहमंत्री आणिले देशमुख यांची चौकशी करीत आहे. आज याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्याने सीबीआय टीमने पीपीई कीट घालून देशमुख यांच्या घरांची व मालमत्तांची झाडाझडती घेतली आहे.

Advertisement

दिवसभर चालू असलेल्या या चौकशीला देशमुख यांनी सहकार्य केल्याचा दावा केला आहे. त्यांनी याबाबत ट्विटरवर लिहिले आहे की, सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे.

Advertisement

ANIL DESHMUKH on Twitter: “सीबीआयच्या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करून मी कोरोनाच्या अनुषंगाने काटोल व नरखेड येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोविड विलगीकरण केंद्रांची पाहणी करण्यासाठी निघालो आहे.” / Twitter

Advertisement

नागरिक संजय फलके यांनी त्यांच्या ट्विटरवर प्रतिकिया लिहिली आहे की, तुमच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा पुर्ण विश्वास आहे. तुम्ही खंबीर रहा. गुजरात, कर्नाटक, गोवा या ठिकाणी २०१४ नंतर CBI / ED कधीही गेल्याची बातमी नाही. फक्त महाराष्ट्रात मात्र दत्तक घेतल्यासारखे येतात , महाराष्ट्र कधीही कुणासमोर झुकणार नाही हे दाखवून दया. अनेक राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांनी याप्रकरणी भाजपवर टीका केली आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply