Take a fresh look at your lifestyle.

‘स्वयंभू’तर्फे रक्तदान शिबीर; सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नगरी युवकांचा पुढाकार

अहमदनगर :

Advertisement

महाविद्यालयीन युवक-युवतींनी एकत्रितपणे येऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा घेतला आहे. अहमदनगर शहर व जिल्ह्यातील या तरुण-तरुणींनी स्वयंभू युवा प्रतिष्ठान नावाची संस्था यासाठी स्थापन केली आहे. आताच्या करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात रक्ताचा तुटवडा कमी पडू न देण्यासाठी या संस्थेने श्रीगोंदा येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.

Advertisement

याबाबत माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर नगरे यांनी सांगितले की, प्रत्येकवर्षी संस्थेतर्फे रक्तदान शिबिरे घेतली जातात. महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी यामध्ये सहभागी होतात. संपूर्ण जिल्ह्यातून याला प्रतिसाद मिळतो. आताच्या करोना कालावधीत आम्ही अगोदर रक्तदाता नोंदणी करून मगच शिबिराचे आयोजन करतो. ऐनवेळी गोंधळ किंवा गर्दी होऊ नये आणि करोना प्रोटोकॉल योग्य पद्धतीने पाळून शिबीर घेण्याचे नियोजन चालू आहे.

Advertisement

Sachin Mohan Chobhe (बातमीजीवी) on Twitter: “नक्कीच सहभागी हा..👍 https://t.co/U5Qdp5uOHR” / Twitter

Advertisement

यासाठी नगरे (मो. ९६१३९३९४९५) यांच्यासह सौरभ राउत (मो. ८८३०२०७४७५) व पावन क्षीरसागर (मो. ९१३०७७०९८४) यांच्याकडे नावनोंदणी करावी. रक्तदात्यांनी या शिबिरात नोंदणी केल्यावर मग त्यांना याची तारीख आणि वेळ कळवला जाणार आहे. यासाठी नागरिकांनी रक्तदान शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी वरील मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply