Take a fresh look at your lifestyle.

वणवण करतानाच ‘तिने’ दिले तोंडातून फुकून ऑक्सिजन; मात्र, अखेर झुंज ठरली अपयशी..!

दिल्ली :

Advertisement

करोना विषाणूला हरवून.. जगण्याची आस ठेऊन अवघा भारत देश कोणत्याही ठोस सरकारी मदतीविना धडपडत आहे. या धडपडीत आप्तेष्टांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून अनेकजण औषधे आणि ऑक्सिजन बेडसाठी वणवण करीत फिरत आहेत. सरकारच्या या अपयशाला आणखी अधोरेखित करणारी एक दुर्दैवी घटना आग्रा शहरात घडली आहे. आपल्या पतीला वाचवण्यासाठी चक्क तोंडाने हवा फुंकून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न एक पत्नी करीत असल्याचा एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, अखेर त्या पत्नीची झुंज निष्फळ ठरली आहे. कारण, तिचा जीवनसाथी असलेल्या पतीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Advertisement

आगऱ्यात ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने 47 वर्षीय रवी सिंघल यांना वाचवण्यासाठी पत्नी रेनू सिंघल यांनी केलेली लढाई अवघ्या देशाला चटका लावून गेली आहे. वी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पत्नी रेनूने तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस तो प्रयत्नही त्यांना वाचवू शकला नाही. कारण, वेळेत ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रवी हे आपल्या कुटुंबाला सोडून परलोकाच्या प्रवासाला गेले आहेत.

Advertisement

आगऱ्यात विकास सेक्टर सात येथे वास्तव्यास असलेल्या वी सिंघल यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रेनू यांनी त्यांना आपल्या नातेवाईकांच्या मदतीने रवी यांनी रिक्षाने श्रीराम हॉस्पिटलला नेले. तिथे बेड उपलब्ध नसल्याने मग त्यांनी साकेत हॉस्पिटल, केसी नर्सिंग होम येथेही प्रयत्न करून पाहिला. तीन ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने एसएन मेडिकल कॉलेज येथे नेल्यावर रवी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, पत्नी रेनू यांनी पतीला थेट तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केल्याचा फोटो व्हायरल झालेला आहे. अनेकांनी त्यावर हालहाल व्यक्त केली आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

TV9 Marathi on Twitter: “महामारीचं भयान वास्तव, ऑक्सिजन बेड मिळेना, पत्नीकडून रिक्षात पतीला तोंडातून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न, आख्खा देश हळहळला https://t.co/JLlGnLeACl #CoronaPandemic #CoronaVirus #Agra #CoronaDeath #Oxygenbed #OxygenShortage” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply