Take a fresh look at your lifestyle.

बारामतीचे ‘ते’ औषध आहे करोनावर भारी; पहा नेमके काय म्हटलेय रोहित पवारांनी

पुणे :

Advertisement

करोना विषाणूची लागण होऊ नये किंवा लग्न झाल्यावर हा काढा प्या.. ते आयुर्वेदिक औषध रामबाण आहे.. याच्या आतापर्यंत हजारो बातम्या आलेल्या आहेत. काहींनी तर यातून फ़क़्त चमकोगिरी केली आहे. मात्र, आता बारामती येथील संशोधकांनी एक साधे-सोपे औषध आणलेले आहे. त्या संशोधनाची दखल जगप्रसिद्ध ‘फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी’ या वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नलने घेतली आहे.

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “हळदीतील ‘करक्युमीन’ हा घटक आणि काळी मिरी यांचं मिश्रण असलेलं औषध कोरोनावर अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं बारामतीतील डॉक्टरांच्या एका चमूने केलेलं संशोधन प्रसिद्ध ‘फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी’ या वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नलमध्ये प्रसिद्ध झालंय. https://t.co/A3bh7vNEtZ” / Twitter

Advertisement

बारामतीच्या संशोधनाची ही खुशखबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर सांगितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हळदीतील ‘करक्युमीन’ हा घटक आणि काळी मिरी यांचं मिश्रण असलेलं औषध कोरोनावर अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं बारामतीतील डॉक्टरांच्या एका चमूने केलेलं संशोधन प्रसिद्ध ‘फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी’ या वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नलमध्ये प्रसिद्ध झालंय.

Advertisement

पुढे त्यांनी लिहिले आहे की, या संशोधनाच्या टीममध्ये माझे जवळचे नातेवाईक डॉ. कीर्ती पवार, डॉ. सतीश पवार, डॉ.रमेश भोईटे, सम्राज्ञी पवार आणि डॉ. राहुल भोईटे यांच्यासह डॉ. राहूल मस्तूद, डॉ.मीनल कुलकर्णी व आदिती देशपांडे यांचा समावेश आहे.या सर्व डॉक्टर मंडळींचं मनःपूर्वक अभिनंदन! कोरोनाला रोखण्यास या संशोधनाची मोठी मदत होईल.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply