Take a fresh look at your lifestyle.

सहकारी बँकांच्या सभासदांना दिलासा; पहा रिझर्व्ह बँकेनं काय निर्णय घेतलाय..!

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रात सहकारी चळवळीला नेहमीच महत्वाचे स्थान राहिलेले आहे. सहकारी बँका (Cooperative Banks), पतसंस्था (Financial Institutes), साखर कारखाने (Sugar Factories) आणि बऱ्याच संस्था सहकारी तत्त्वावरच सुरु झाल्या, खुलल्या. त्यांचा विस्तार झाला. गेल्या काही दिवसांपासून सहकारी चळवळीला घरघर लागल्याचे दिसत असले, तरीही आजही ग्रामीण भागाचे अर्थकारण (Rural Economy) सहकारावरच चालते.

Advertisement

देशात कोरोनाची दुसरी महाभयंकर लाट आली आहे. या लाटेने पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे संकट उभं केलं आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. अशा या संकट काळात बँकांनी स्व-निधी आणि भांडवलाबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. आकस्मित तोटा झाल्यास तो सहन करण्याइतपत भांडवल प्रमाण राखून ठेवावे, असा सल्ला आरबीआयने (RBI / रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) बँकांना दिला आहे.

Advertisement

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकाच्या सभासदांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सहकार क्षेत्रातील बँकांना लाभांशवाटप करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे सहकारातील लाखो सभासदांना लाभांश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लाभांश वितरणासंदर्भात नुकताच रिझर्व्ह बँकेने एक अध्यादेश जारी केला. त्यात वाणिज्य बँकांवर लाभांश वाटपाबाबत निर्बंध कायम आहेत, मात्र, सहकारी बँकांना या निर्बंधातून मुक्त केले आहे.

Advertisement

शेड्युल कमर्शिअल अर्थात वाणिज्य बँकांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात नफा झाला असल्यास, त्यात केवळ ५० टक्क्यांपर्यंत लाभांश सभासदांना वितरीत करावा, असे निर्देश ‘आरबीआय’ने दिले आहेत. मात्र, सहकारी बँकांना लाभांश वितरणाबाबत कोणतेही बंधन नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Advertisement

समभागावर लाभांश ठरवताना बँकेच्या संचालक मंडळाने सध्याची बँकेची आर्थिक स्थिती, भविष्यातील भांडवलाचा आढावा घेणं आवश्यक आहे. शिवाय भविष्यात लागणारे भांडवल, तोटा झाल्यास करावी लागणारी तरतूद , सध्याची आर्थिक स्थिती आणि त्याचा नफ्यावर होणारा परिणाम, या घटकांचा विचार करून लाभांश निश्चित करावा, असे निर्देश ‘आरबीआय’ने दिले आहेत.

Advertisement

दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाने राज्यामधील सहकार क्षेत्रातील लाखो सभासदांना दिलासा मिळाला आहे. सहकारातील बड्या बँकाकडून आता लवकरच लाभांश जाहीर केले जातील, त्याचे वितरण केले जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply