Take a fresh look at your lifestyle.

म्हणून दोनशे धावा केल्यावर दमलेला सचिन रात्रभर झोपू शकला नव्हता..!

मुंबई :

Advertisement

२४ एप्रिल हा दिवस सचिनच्या चाहत्यांसाठी उत्सवापेक्षा कमी नसतो, कारण यादिवशी मास्टर-ब्लास्टरचा वाढदिवस असतो. आज सचिन आपला ४८  वा वाढदिवस साजरा करीत आहे. या महान खेळाडूने क्रिकेटविश्वात असंख्य विक्रमांची नोंद आपल्या नावावर केली आहे. ४० वर्षांच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर वन डे सामन्यात पहिले दुहेरी शतक सचिननेच झळकावले. या ऐतिहासिक खेळीशी निगडित एक रंजक किस्सा आहे.

Advertisement

किस्सा २४ फेब्रुवारी २०१० रोजीचा आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्‍यावर होता. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला. जिथे सचिनने संपूर्ण ५०  षटके फलंदाजी केली आणि वनडे इतिहासातील पहिले दुहेरी शतक ठोकले. तो १४७  चेंडूत २००  धावा करून नाबाद राहिला. या खेळीदरम्यान त्याने २५  चौकार आणि ३ षटकारही ठोकले. १३६  च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या डावामुळे कॅप्टन रूपसिंग स्टेडियमचे नाव कायमचे अमर झाले.

Advertisement

३८  वर्षांचा सचिन या ऐतिहासिक खेळीनंतर खूप दमला होता. त्याच्या आत्मचरित्रामध्ये या दिवसाबद्दल लिहायला तो कसा विसरेल. तो लिहितो की सामन्यानंतर मी खूप थकलो होतो. असे असूनही,  त्याला रात्रभर झोप आली नाही. तो म्हणाला की त्या संध्याकाळी तो इतका आनंदी आणि उत्साहित होता की त्याला रात्रभर झोप आली नव्हती.

Advertisement

सचिनच्या या दुहेरी शतकापूर्वी पाकिस्तानच्या सईद अन्वर आणि झिम्बाब्वेच्या चार्ल्स कॉव्हेंट्रीच्या नावावर वन डे मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम होता. अन्वरने १९९७  मध्ये भारताविरुद्ध आणि चार्ल्सने २००९ मध्ये बांगलादेशविरुध्द १९४ धावांची खेळी केली होती. सचिननंतर विरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध  २१९  धावांची खेळी केली. यानंतर रोहित शर्मानेही २००  धावा केल्या. रोहितने श्रीलंकेविरुद्ध २६४  धावा केल्या असून एकदिवसीय सामन्यात त्या सर्वाधिक वैयक्तिक धावा आहेत. याशिवाय मार्टिन गुप्टिल आणि ख्रिस गेल यांनी वनडेमध्ये दुहेरी शतके ठोकली आहेत.

Advertisement

 संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply