Take a fresh look at your lifestyle.

पतंजलीच्या करोना रुग्णांबाबत रामदेवबाबांनी केला ‘हा’ महत्वाचा दावा..!

दिल्ली :

Advertisement

आपल्याच पतंजली कंपनीकडे करोना विषाणूवर रामबन इलाज असल्याचा दावा करणाऱ्या रामदेव बाबा यांच्या आश्रम व कंपनी परिसरात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्यावर बाबांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आरोग्य विभागाचे आकडे एकदमच खोटे असून अजिबात रुग्ण नसल्याचा दावा केला आहे.

Advertisement

पतंजली योगपीठाशी संबंधित संस्थांनाही करोना विषाणूने अडचणीत आणण्यास सुरवात केली आहे. दीड महिन्यात तिथे एकूण 115 लोकांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील 13 दिवसात येथे 83 लोकांना संसर्ग झाला आहे. दुसरीकडे बाबा रामदेव यांनी आरोग्य विभागाचे म्हणणे खोटे असल्याचे म्हटले आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीमध्ये योग आणि त्याच्या औषधांद्वारे कोरोनाला संपवण्याचा दावा करण्यात आला आहे.

Advertisement

MyGovIndia on Twitter: “Remdesivir can have dangerous side effects if used in high dosages without consulting. Watch Dr. Naresh Gupta, Senior Medical Consultant, MAMC explain that why it is only meant to be given to patients admitted to hospital. #IndiaFightsCorona @MoHFW_India @PMOIndia @PIB_India https://t.co/OyQPIZVYHu” / Twitter

Advertisement

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, योगग्राममध्ये 28 आणि आचार्यकुलममधील 9 जणांना कोरोना बाधा झाली आहे. सीएमओ डॉ. एसके झा यांचे म्हणणे आहे की, ही प्रकरणे एकत्र किंवा एका दिवसात आली नाहीत. परंतु दीड महिन्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी 115 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 10 एप्रिलपासून आतापर्यंत 83 रुग्ण सापडले आहेत. पतंजलीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झाल्यानंतर आरोग्य विभाग पतंजलीतील महत्त्वपूर्ण लोकांची कॅव्हिड टेस्ट घेण्याची तयारी करत आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचीही लवकरच कोरोना चाचणी होणार आहे.

Advertisement

दरम्यान, बाबा रामदेव यांनी आरोग्य विभागाच्या पतंजलीतील कोरोना संक्रमणाची आकडेवारी चूक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, पतंजलीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडले नाहीत. पतंजली येथे येणाऱ्यांची प्रथम कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. जे त्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडता त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. सरकार खूप चांगले काम करत आहे. त्यामुळे लवकरच सर्वांनाच कोरोना साथीच्या आजारापासून मुक्ती मिळेल.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

India TV on Twitter: “#पतंजलि संस्थानों में कोरोना पॉजिटिव अफवाहों पर क्या बोले योग गुरु @yogrishiramdev सुनिए #AajKiBaat @RajatSharmaLive https://t.co/mdS1qO2cBw” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply