Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का; महागाई भत्त्याबाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

मुंबई :
कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेचा (Economy in Corona Crises) गाडा सध्या काहीसा मंदावला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग-धंदे बसले. एकूण अर्थव्यवस्थेतच काही प्रमाणात शिथिलता आली आहे. महसुली वसुलीतही मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरच बरेच उत्पन्न खर्च होत असल्याने विकासकामांनाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे सरकारने काही प्रमाणात काटकसर करताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Advertisement

महागाई भत्त्याबाबत केंद्र सरकारने नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार येत्या १ जुलै २०२१ पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA / Dearness allowance) वाढवला जाणार नाही. जुन्या दरानेच त्यांना महागाई भत्ता मिळेल. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत घोषणा करताना 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता अपडेट करण्यात येणार असल्याचे सांगितलं होते. मात्र, आता सरकारने यामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने 1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्यात वाढच केलेली नाही. इतकंच नाही, तर 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत कोणतीही थकबाकी दिली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘एरियर्स’ही मिळणार नाहीत.

Advertisement

सध्या कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. 1 जुलै 2021 पासून तो 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार होता. बेसिक पगाराच्या आधारावर महागाई भत्ता दिला जातो. प्रवासखर्चही (ट्रॅव्हलिंग अलाऊंस / Travelling) महागाई भत्त्यासोबत वाढत जातो. त्यामुळे महागाई भत्ता वाढल्यावरच ट्रॅव्हलिंग अलाऊंससुद्धा (TA) वाढेल.
सातव्या वेतन आयोगानुसार (Seventh Pay Commission) कर्मचाऱ्याचा पगार तीन भागात विभागला जाईल. त्यात मूळ वेतन, भत्ते आणि पगारातून होणारी कपात, हे तीन भाग असतील. सातव्या वेतन आयोगातील ‘सीपीसी फिटमेंट फॅक्टर’ हा सर्व भत्त्यांनी गुणले जाणारे मूळ वेतन आहे. नेट सीटीसी (CTC) जाणून घेण्यासाटी मूळ वेतनाला फिटमेंट फॅक्टर (2.57)ने गुणावे लागते, त्यानंतर त्यात भत्ते समाविष्ट केले जातील.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply