Take a fresh look at your lifestyle.

अंबानींची ब्रिटनमध्ये ‘शॉपिंग’; पहा काय काय खरेदी केलंय?

मुंबई :
भारतातील ‘नंबर वन’ श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) यांना ओळखले जाते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचेच भारतीयांना अप्रूप असते. मग ते मुलीचे लग्न असो, वा त्यांचे 27 मजली घर.. त्यातील सुविधा आणि बरेच काही.. आताही एका गोष्टीमुळे अंबानी यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. कारण, ज्या ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले, तेथे जाऊन अंबानी यांनी भली मोठी शॉपिंग (Big Shopping) केली आहे. चला तर मग, अंबानी यांनी ब्रिटनमध्ये काय काय खरेदी केलंय, ते पाहू या..

Advertisement

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनमधील (England) प्रतिष्ठीत कन्ट्री क्लब (Country Club), लक्झरी गोल्फ रिसॉर्ट (Luxury Golf Resort) आणि स्टोक पार्क 5.70 कोटी पौंड, म्हणजेच भारतीय चलनानुसार 592 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकूण 592 कोटी रुपयांची बोली लावली. ‘रिलायन्स’ने खरेदी केलेल्या ‘लक्झरी गोल्फ रिसॉर्ट’ हे जेम्स बाँड (James Bond) आणि ऑरिक गोल्ड फिंगर यांच्यामुळे प्रसिद्ध आहे. ‘स्टोक पार्क’चा इतिहास जवळपास 900 वर्षे जुना आहे. 1908 पर्यंत ‘स्टोक पार्क’ खासगी रेसिडेन्सी म्हणून वापरण्यात येत होते.

Advertisement

रिलायन्स इंडस्ट्रीजने ब्रिटनमध्ये पहिला कौंटी क्लब खरेदी केला आहे. हा क्लब इंटरनॅशनल ग्रुपकडून खरेदी करण्यात आला होता. या ग्रुपची मालकी ‘किंग फॅमिली’च्या दुसऱ्या पिढीकडे आहे. नव्यान खरेदी केलेली मालमत्ता रिलायन्स इंडस्ट्रीयल इन्वेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज लिमिटेड (Reliance Industrial Investments & Holdings Ltd.) यांच्याकडे जाणार आहे. ही कंपनी पूर्णपणे मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.

Advertisement

‘स्टोक पार्क’ यूरोपमधील सर्वाधिक प्रशस्त असं गोल्फ पार्क आहे. इथे अनेक हॉलीवूड चित्रपटांचं शुटिंग झालं आहे. ‘स्टोक पार्क’ बरमिंगहशायर येथे 300 एकरांमध्ये आहे. या पार्कमध्ये राहण्यासाठी 49 बेडरुम, स्पा, स्वीमिंग पूल, फिटनेस क्लब आदी सुविधा आहेत. 2013 मध्ये या रिसॉर्टला ‘फाईव्ह रेड एए स्टार’ रेटिंग मिळालं होतं. हॉटेल इंडस्ट्रीला (Hotel Industry) दिलं जाणारं हे सर्वोत्तम रेटिंग समजलं जात.
रिलायन्स इंडस्ट्रीज ‘स्टोक पार्क’मध्ये खेळाच्या सुविधा निर्माण करणे, वारसास्थळांचा विकास, हे सर्व स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार करण्यात येईल, असं ‘रिलायन्स’कडून कळवण्यात आलं आहे.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply